बाबा निरालाची साध्वी बनूनही मिळाला नाही सक्सेस; Tridha Chawdhary कडे नाही काम...

आत्ता पर्यंत 'आश्रम' (Aashram Web Series)या वेब सिरीजचे तीन पार्ट रिलीज झाले आहेत. या तिनही पार्टला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. 

Updated: Jan 5, 2023, 05:14 PM IST
बाबा निरालाची साध्वी बनूनही मिळाला नाही सक्सेस; Tridha Chawdhary कडे नाही काम... title=

मुंबई : आश्रम (Aashram) या बहूचर्चित वेबसीरीजमधून चर्चेत आलेली बबीता भाभी अर्थात त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) आश्रय (Aashram) या वेब सीरिजमध्ये 'बबिता' ही व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तसेच त्रिधा तिच्या ग्लॅमरस शैलीसाठीही ओळखली जाते. 
 
आत्ता पर्यंत 'आश्रम' (Aashram Web Series)या वेब सिरीजचे तीन पार्ट रिलीज झाले आहेत. या तिनही पार्टला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या वेब सिरीजवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या सिरीजमध्ये एक पात्र होतं ते म्हणजे बबिता जे साकारलं एक्ट्रेस त्रिधा चौधरीने. मात्र एका रात्रीच प्रकाश झोतात आलेल्या त्रिधा (Tridha Choudhury) कडे सध्या एकही प्रोजेक्ट नाहीये. त्यामुळे तिचे चाहते सध्या नाराज आहेत. 

आश्रममध्ये त्रिधाने बाबा निराला यांच्या साध्वीची भूमिका साकारली होती. मात्र साधना करूनही तिला काही फायदा होताना दिसत नाही. ती आश्रम 4 मध्ये दिसू शकते मात्र याशिवाय सध्या तिच्याकडे कोणते बडे प्रोजक्ट असतील अशी माहिती नाही. ना ही ती कोणत्याही वेब सीरिजमध्ये दिसणार आहे  ना ही ती  कोणत्याही चित्रपटात दिसणार आहे.

त्रिधा चौधरी कोणत्याही चित्रपटात, टीव्ही शोमध्ये किंवा मालिकेत दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या व्हिडिओंच्या माध्यमातून हेडलाईनमध्ये असते ही वेगळी बाब आहे. त्रिधाच्या इंस्टाग्रामवर अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. बंगाली सिनेमात भरपूर काम करणारी त्रिधा टीव्ही शो दहलीजमध्ये दिसली होती ज्यामध्ये तिला चांगलीच पसंती मिळाली होती.

यानंतर तिने ओटीटीवर आपली छाप सोडली. तिने बऱ्याच सिरीजमध्ये काम केलं आहे. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती म्हणजे आश्रम सिरीजमधून. ज्यामध्ये तिने सगळ्यात बोल्ड भूमिका साकारुन प्रसिद्धी मिळवली. या सिरिजमध्ये तिने बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा पार केल्या.

आश्रम (Aashram) या वेब सीरिजच्या तिन्ही सीझनमध्ये त्रिधाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केले होतं. तिचे काम प्रेक्षकांनाच खुपच आवडलं होतं. आता आश्रमच्या चौथ्या सीझनमध्येही त्रिधा (Tridha Choudhury) दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या सीझनची उत्सुकता लागली आहे.