Trending News : मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हटलं जातं. पण आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद आजही समाजात कायम आहे. मुलगी नको, मुलगाच हवा, ही मानसिकता एकविसाव्या शतकातही बदलेली नाही. शहर असो वा गाव, शिक्षित असो की अशिक्षित, गरीब-श्रीमंत, जात-पात सगळीकडे मुलीला नाकारलं जातं. आजही अंगावर काटा आणणाऱ्या घटना आजूबाजूला घडत असतात.
असं असलं तरी अनेक मुली पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. जवळपास प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आपली छाप उमटवली आहे. असंच एक उदाहरण आज जगासमोर आदर्श ठरत आहे. एकापाठोपाठ चार मुली झाल्याने आई-वडिल दु:खी झाले. आपल्या एक मुलगा असावा यांची त्यांना खंत वाटत होती. पण ज्या मुलींमुळे पालक निराश होते, त्याच मुली आज त्यांच्यासाठी अभिमान ठरल्या आहेत. या चारही मुलींचा आज देशभरात डंका आहे.
कोण आहेत त्या चार बहिणी?
आपण ज्या चार बहिणींबाबत बोलत आहोत, त्यांना आज देशभरात मोहन सिस्टर्स (Mohan Sisters) नावाने ओळखलं जातं. आपापलं वेगळ क्षेत्र निवडत मोहन सिस्टर्सने उच्च पद गाठलं आहे. या बहिणींची नावं आहेत नीती मोहन (Niti Mohan), शक्ती मोहन (Shakti Mohan), मुक्ती मोहन (Mukti Mohan) आणि क्रिती मोहन (Kriti Mohan). आज देशासह जगभरात मोहन सिस्टर्सने आपली वेगळी ओळक निर्माण केली असून त्यांचं फॅन फॉलोईंग मोठं आहे. पाठोपाठ चार मुली झाल्याने जे वडिल नाराज होते, त्याच वडिलांना आपल्या मुलींची प्रगती पाहून अभिमान वाटतो.
1) निती मोहन : मोहन सिस्टर्समध्ये सर्वात मोठ्या मुलीचं नाव नीती मोहन. नीती मोहन प्रसिद्ध गायिका (Singer) असून बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक चित्रपटांमध्ये तीने आपल्या सुमधूर आवाजात गाणी गायली आहे. इश्क वाला लव्ह या गाण्यने नीती मोहनला प्रसिद्धीच्या शिखरावर बसवलं. गाण्यांच्या अनेक कार्यक्रमात नीती आज जज म्हणूनही काम करते. काही महिन्यांपूर्वीच नीती निहार पांड्या यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली.
2) शक्ती मोहन : मोहन सिस्टर्समधल्या दुसऱ्या मुलीचं नवा आहे शक्ती मोहन. शक्ती ही एक उत्तम डान्सर आहे. डान्सच्या क्षेत्रात आज तीचं नाव प्राधान्याने घेतलं जातं असून प्रसिद्ध कोरिओग्राफर (choreographer) म्हणूनहीतिला ओळखलं जातं. डान्सच्या काही रिअॅलिटी शोमध्ये शक्ती मोहन जज म्हणून करत आहे.
3) मुक्ती मोहन : तिसऱ्या क्रमांकाची बहिण मुक्ती मोहन ही अभिनेत्री (Actress) आणि डान्सर आहे. मुक्तीने काही हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. 2007 मध्ये विशाल भारद्वाज यांच्या 'ब्लड ब्रदर्स' या शॉर्ट फिल्ममधून मुक्तीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर छोट्या पडद्यावरही तीने काही मालिकांमध्ये काम केलं. डान्स कोरिओग्राफर म्हणूनही मुक्तीने आपली ओळख निर्माण केली आहे.
4) क्रिती मोहन : मोहन सिस्टर्समध्ये सर्वात लहान बहिणीचं नाव आहे क्रिती मोहन. क्रिकी मोहन बॉलिवूडपासून लांब आहे. पण इंजिनिअरिंग क्षेत्रात तीने आपला ठस् उमटवला आहे. एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते.
मोहन सिस्टर्स आज संपूर्ण देशाला माहित आहेत. ज्यांना मुली नकोशा वाटतात, त्यांच्यासाठी मोहन सिस्टर्स या आदर्श उदाहरण आहेत.