Mallika Sherawat Troll: अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) सध्या बॉलीवूडपासून (Bollywood) दूर असली तरी सोशल मीडियावर (Social Media) चाहत्यांसाठी ती आपले फोटो शेअर करत असते. पण अनेकवेळा रिवीलिंग ड्रेसमुळे (Revealing Dress) तीला टीकेला सामोरं जावं लागतं. असं काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. मल्लिका शेरावतने स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) बिकनीवर (Bikini) हॉट फोटशूट (Hot PhotoShoot) केलं आहे. सोशल मीडियावर हे फोटो शूट चांगलेच व्हायरल झाले आहेत. पण या फोटोशूटमुळे ती अडचणीत सापडली असून ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधला आहे. (Mallika Sherawat Troll)
मल्लिकाचं हॉट फोटोशूट
46 वर्षांची असलेली मल्लिका शेरावत आजही तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस (Glamorous) दिसते. आपल्या हॉटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या मल्लिकाने स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट केलं आहे. यावेळी तीने एकाहून एक हॉट पोझही दिल्या आहेत. पण या फोटोशूटच्यावेळी मल्लिकाने ज्या रंगाची बिकनी परिधान केली होती, त्यावरुन ती चांगलीच ट्रोल होतेय.
बिकनीच्या रंगावरुन वाद
मल्लिका शेरावतचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. पण मल्लिकाने भगव्या रंगाची बिकनी (Saffron colored Bikini) परिधान केल्याने वाद उभा राहिला आहे. भगव्या रंगाच्या बिकनीवरुन काही युजर्सने तिला सुनावलं आहे. तर काही जणांनी आता मल्लिका शेरावतला बॉयकॉट करणार का असा सवाल उपस्थित केला आहे. एका युजर्सने तर मॅडम तुम्हाला दुसरा रंग मिळाला नाही का असं म्हणत #Boycott असं म्हटलं आहे.
भगव्या बिकनीवरुन दीपिका ट्रोल
आगामी पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) भगव्या रंगाची बिकनी परिधान केली आहे. यावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. भगव्या रंगाच्या बिकनीवरुन दीपिकाला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. भगवी बिकनी परिधान केल्याने धार्मिक भावना भडकवल्या जात असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. यानंतर दीपिका पदुकोणबरोबरच पठाण चित्रपटालाही बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि पदुकोणचा पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.