'काळजी घेऊनही अखेर जे नको तेच घडलं', प्रसिद्ध अभिनेत्रीची भावुक पोस्ट

 अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली.

Updated: Feb 27, 2022, 04:35 PM IST
'काळजी घेऊनही अखेर जे नको तेच घडलं', प्रसिद्ध अभिनेत्रीची भावुक पोस्ट title=

मुंबई: कोरोना संसर्ग वाढण्यावर नियंत्रण आलं असलं तरी धोका अजूनही टळलेला नाही. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने एक भावुक पोस्ट करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसनला कोरोनानं अखेर गाठलंच. श्रुतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. श्रुती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. तिने सोशल मीडिया अकाऊंटवर चाहत्यांना आपल्या हेल्थचे अपडेट्स दिले आहेत. 

सगळी काळजी घेऊनही अखेर मला कोरोनाचा संसर्ग झाला असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी ठीक आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि प्रार्थना माझ्यासोबत आहेतच त्यासाठी तुमचे मनापासून आभार. मी लवकरच पुन्हा तुम्हाला भेटायला येईन.