लॉकडाऊननंतर झी मराठी प्रस्तुत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटक रंगभूमीवर

 पुण्यात 12, 13 डिसेंबरला प्रयोग

Updated: Dec 1, 2020, 01:28 PM IST
लॉकडाऊननंतर झी मराठी प्रस्तुत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटक रंगभूमीवर title=

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेली जवळपास ९ महिने नाट्यगृह बंद होती त्यामुळे नाट्यवेड्या रसिकप्रेक्षकांना दर्जेदार नाटकांना मुकावं लागलं. पण आता प्रतीक्षा संपली आहे, महाराष्ट्रामध्ये कोरोना संकटाशी सामना करता करता पुनश्च हरिओम म्हणत पुन्हा अनेकांनी कामाला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यात सिनेमागृह, नाट्यगृह उघडण्यास सशर्त मंजुरी दिली आहे.

त्यामुळे पुन्हा तिसरी घंटा कधी वाजणार याची प्रतिक्षा रसिक आणि नाट्यकर्मींना होतीच अखेर त्याची नांदी पुण्यात "झी मराठी प्रस्तुत आणि प्रशांत दामले फॅन फौंडेशन निर्मित' ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या धम्माल विनोदी नाटकाने होणार आहे. येत्या डिसेंबर १२ आणि १३ डिसेंबर पासून पुण्यातून या नाटकाचा पुन्हा शुभारंभ होतोय. या प्रयोगाची तिकिटे Book my show वर उपलब्ध आहेत. 

हे सांगतानाच झी मराठी वाहिनीचे व्यवसाय प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, एका लग्नाची पुढची गोष्ट ह्या नाटकाने नाट्यश्रुष्टी अनलॉक होतेय ह्याचा खूप आनंद होतोय. यामुळे नाट्यकर्मी आणि एकूणच नाट्य व्यवसायाला एक उभारी मिळेल, झी मराठी ची प्रस्तुती असलेल्या नाटकांची मेजवानी सुद्धा रसिकांना लवकरच अनुभवता येणार आहे. रसिकप्रेक्षकांनी सुद्धा नाट्यगृहात न घाबरता सुरक्षेची सगळी काळजी घेऊन येणाऱ्या नाटकांचा आस्वाद घ्यावा.