बॉलीवूड एक्ट्रेसपेक्षा कमी नाहीय IPS अंकिता शर्मा, 'या' कारणामुळे चर्चेत

 आयपीएस अंकिता शर्मा (Ankita Sharma) यांची सोशल मीडिया सध्या जोरदार चर्चा 

Updated: Dec 1, 2020, 01:05 PM IST
बॉलीवूड एक्ट्रेसपेक्षा कमी नाहीय IPS अंकिता शर्मा, 'या' कारणामुळे चर्चेत title=

नवी दिल्ली : आयपीएस अंकिता शर्मा (Ankita Sharma) यांची सोशल मीडिया सध्या जोरदार चर्चा आहे. त्या सध्या होतकरु तरुणांना सहाय्य करतायत. अंकिता शर्मा या पूर्ण आठवडा व्यस्त असतात आणि रविवारी एका शिक्षिकेच्या भूमिकेत असतात. आपल्या कार्यालयाजवळील २० ते २५ तरुणांना त्या शिकवतात. जे लोकसेवा आयोगाची तयारी करतात. कोचिंगची फी न परवडणाऱ्या होतकरु तरुणांना यामुळे फायदा झालाय. 

Ankit got Success in 2018

आयपीएस अंकिता शर्मा (Ankita Sharma) छत्तीसगडची राजधानी रायपूरच्या आझाद चौक येथील नगर पोलीस अधीक्षक (सीएसपी) पदावर आहेत. त्या छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आल्यायत. त्यांनी सरकारी शाळेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं. 

आयपीएस बनण्याची त्यांची इच्छा होती याबद्दल त्यांना माहिती नव्हती तसेच मार्गदर्शन करणारं देखील कोणी नव्हतं. यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

Wanted to become an IPS since childhood

युपीएससीची तयारी करताना त्यांचं लग्न झालं. त्याचे पती विवेकानंद शुक्ला हे आर्मी मेजर असून ते सध्या मुंबईत ड्युटीवर आहेत. पतीसोबत त्यांना जम्मू काश्मीर, हैदराबाद, झांसी सारख्या शहरात रहावे लागले. यूपीएससी परीक्षा दोनवेळा अयशस्वी झाल्या. पण त्यांनी हार मानली नाही आणि तिसऱ्या वेळेस त्यांनी परीक्षा पास केली.