हरवलेल्या परिवाराला लागलेलं ग्रहण कसं दूर करेल रमा?

 वैविध्यपूर्ण मालिका सादर करून झी मराठी या वाहिनीने महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ग्रहण या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्याच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलेआहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांचा पसंतीस पडला.

हरवलेल्या परिवाराला लागलेलं ग्रहण कसं दूर करेल रमा? title=

मुंबई : वैविध्यपूर्ण मालिका सादर करून झी मराठी या वाहिनीने महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ग्रहण या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्याच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलेआहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांचा पसंतीस पडला.
 
निरंजन, मोनू आणि लक्ष्मी यांच्यात रमा तिचे हरवलेले कुटुंबीय शोधतेय आणि त्यांना आपल्या जवळ कसं करता येईल यासाठी ती धडपड करताना दिसते.येत्या रविवारी ग्रहण मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात रमा तिचं हरवलेलंकुटुंब पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी येणाच्या प्रयत्न केला त्यांचा रमाने काटा काढण्याचे ठरवले आहे.
 
मालिकेविषयी बोलताना रमा म्हणजेच अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाल्या, "गूढ कथांचे आकर्षण मला पहिल्यापासूनच आहे सुरुवातीला जेव्हा मला मालिकेबाबत विचारण्यात आले तेव्हा मी नाही म्हणण्याच्या बेतात होते, पण जेव्हापटकथा वाचली मला ती प्रचंड आवडली आणि ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही संपूर्ण मालिका फक्त १०० भागांचीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथेयेण्याची शक्यता खूप कमी आहे. जेव्हा मी ही मालिका करण्याचे ठरवले तेव्हा सर्वप्रथम धारपांची 'ग्रहण' ही कादंबरी संपूर्ण वाचून काढली. आम्ही मालिकेचा गाभा ही कादंबरीच ठेवली असली तरी कथानकात बरेच बदल केलेआहेत. व्यक्तिरेखांची नावे देखील बदलली आहेत. मला खात्री आहे एका नंतर एक येणाऱ्या भागातून उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल आणि त्यासाठी हा एक तासाचा विशेष भाग पाहायला विसरू नका"  
 
रमा तिचं हरवलेलं कुटुंब पूर्ण करू शकेल का? तिच्या आड येणाऱ्या लोकांचा ती काटा कसा काढेल? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका रविवार १५ एप्रिलला रात्री ९ वाजता