Aryan Khan Drugs case arrest : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला काही दिवसांपूर्वी एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. कोठडीत गेल्या दिवसापासून आर्यनला कसं सोडवता येईल, यासाठीच शाहरुख आणि त्याच्या टीमकडून प्रयत्न करण्यात आले.
काही केल्या आर्यनचा जामीन मंजूर होत नव्हता. उलटपक्षी दर दिवसाला होणाऱ्या नव्या उलगड्यामुळे त्याच्यावर असणारा अडचणींचा विळखा अधिक घट्ट होत गेला. ज्यानंतर मंगळवारी आर्यन खान प्रकरणाची सुनावणी सुरु झाली. पण, अंतिम निकाल मात्र हाती आला नाही.
Mumbai drugs-on-cruise case: Hearing on bail application of accused Aryan Khan has been adjourned for tomorrow by the Bombay High Court pic.twitter.com/HMNwwIL4fw
— ANI (@ANI) October 26, 2021
मुकुल रोहतगी यांच्या युक्तिवादानंतर आर्यन खान प्रकरणाची सुनावणी बुधवारवर ढकलण्यात आली. न्यायालयाचं कामकाज बुधवारी दुपारपर्यंत स्थगित करण्यात आल्यामुळं आर्यनची आणखी एक रात्र कारागृहातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
बुधवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाचे वकिल न्यायालयात युक्तिवाद मांडतील. त्यानंतर एनसीबीच्या वतीनं नवा युक्तिवाद मांडण्यात येईल. ज्यानंतर न्यायालयात सदर प्रकरणाची सुनावणी होईल. पण, तरीही एनसीबीनं युक्तिवादासाठी वेळ मागितल्यास आर्यनचा न्यायालयातील मुक्काम वाढण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान, न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांची तारीख पाहता सुनावणी लांबल्यास आर्यनच्या अडचणी आणखी वाढू शकतात हे स्पष्ट होत आहे.