अक्षय, रितेशच्या Heyy Babyy चित्रपटातील 'ही' चिमुरडी आता ओळखताच येईना...

Heyy Babyy Child Artist Latest Photos: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे हे बेबी नावाच्या एका चित्रपटाची. तुम्हाला हा चित्रपट आठवत असेलच. यातून अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी हटके कमेस्ट्री पाहायला मिळाली होती. तुम्हाला या चित्रपटातील ती लहान मुलगी आठवते आहे का? पहा किती मोठी झाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 8, 2023, 05:21 PM IST
अक्षय, रितेशच्या Heyy Babyy चित्रपटातील 'ही' चिमुरडी आता ओळखताच येईना...  title=
do you remember the angel from akshay kumars heyy babyy movie latest photos goes viral on instagram

Heyy Babyy Child Artist Latest Photos: मनोरंजनसृष्टीत किंवा जाहिरातींमध्ये तूम्ही अनेकदा लहान बाळांनाही पाहिलं असलेच. बऱ्याच वर्षांनी आपण तीच जाहिरात पुन्हा एकदा पाहिली आणि त्यातील त्या छोटंसं काम करणाऱ्या बाळांना पाहिलं की आपण नेहमीच असं म्हणतो की आता हे बाळं मोठं झालं असेल नाही. हो सध्या अशाच एका लहानग्या बाळाची पुन्हा चर्चा रंगलेली आहे आणि यावेळी हे बाळं फार मोठंही झालं आहे. आम्ही बोलतोय तो चित्रपट म्हणजे अक्षय कुमार, रितेश देशमुखचा 'हे बेबी' हा चित्रपट. या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला माहितीये का की या चित्रपटातून दिसणारं हे बाळं नक्की कोण होतं. त्याचं नवं काय आणि सध्या हे बाळ आहे तरी कुठे?

या लहानग्या अभिनेत्रीचं नावं आहे जुआना संघवी. तिनं आपल्या अजाण पण क्यूट अभिनयानं अनेकांची मनं ही जिंकून घेतली होती. आता ही मुलगी 19 वर्षांची झाली आहे. हे बेबी हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान गर्दी केली होती. कॉमेडी, लव्ह स्टोरी, चिल्डर्सची ही फिल्म होती. त्यामुळे हा चित्रपट तेव्हाही चांगलाच गाजला होता. सध्या जुआनाचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

तिच्या फोटोंवरून तुम्हाला अंदाज येईल की आता जुआना ही किती मोठी झाली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ती 1.5-2 वर्षांची असावी कारण चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी तिचं वय हे 3 होतं. जुआनाचा जन्म हा 22 मार्च 2004 रोजी राजस्थान कोटा येथे झाला. तिनं याच चित्रपटातून बालकलाकारची भुमिका केली होती. सध्या व्हायरल होणाऱ्या तिच्या फोटोतून ती तिच्या पालकांसोबत आणि मित्रमैंत्रीणींसोबत एन्जॉय करताना दिसते आहे. या चित्रपटात तिचं नावं एन्जल असं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडियावर सध्या तिची चर्चा रंगलेली आहे. सध्या आता चित्रपटांतून अशी बालकलाकारांची भुमिका करणारे बालकलाकार समोर येतात पण नाही म्हटलं तरी फारच कमी येताना दिसतात.पुर्वी एक काळ असा होता जेव्हा बालकलाकारांची चांगलीच नांदी असायची. त्यातील अनेक बालकलाकार हे आता मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. अनेकांनी आपल्या करिअरला एक वेगळं वळणंही दिलं आहे. त्यातून सध्या बालकलाकार हे सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर झाले आहेत. त्यांचेही इन्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स असतात.