This Actor Was Naxalite : बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा 16 जून रोजी वाढदिवस आहे. मिथुन दा हे 80 च्या दशकातील नंबर वन स्टार होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये एकामागे एक असे हिट चित्रपट दिले. त्यांच्या बॉलिवूडमधील पदार्पणाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या मृगयातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती डिस्को डान्सर आहे. या चित्रपटातलं गाणं गाना 'आय एम अ डिस्को डान्सर' आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतंय. भारतातील हा पहिला चित्रपट आहे, ज्यानं 100 कोटीं पेक्षा जास्त कमाई केली होती.
मिथुन यांचा जन्म मिडल क्लास कुटुंबात झाला होता. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर ते आज जिथे आहेत तिथे पोहोचले आहेत. पण तुम्हाला माहितीये का की मिथुन चक्रवर्ती हे कधी नक्षलवादी होती. 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत मिथुन हे नक्षलवादी चळवळीत सक्रिय होते. पश्चिम बंगालमध्ये या काळात मोठी अशांतता आणि हिंसाचार पाहायला मिळाला. या काळात मिथुन यांच्या धाकट्या भावाचा अपघातात मृत्यू झाला, ज्यामुळे त्यांच्यावर मोठा आघात झाला आणि नक्षलवादी संघर्षातील हिंसाचाराबद्दल त्यांचा मोहभंग झाला.
मिथुनने अखेर नक्षलवादी चळवळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि जीवनात एक नवा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी जाणले की हिंसा हा समस्या सोडवण्याचा मार्ग नाही आणि यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. नक्षलवादी चळवळ सोडल्यानंतर मिथुन मुंबई (तत्कालीन बॉम्बे) येथे आले आणि अभिनयात करियर घडवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले आणि त्यांना गरिबीत जीवन व्यतीत करावे लागले.नक्षलवादी चळवळीतल्या सहभागाबद्दल मिथुन यांनी अनेक वेळा विचार मांडले आहेत. त्यांना या चळवळीत सामील होण्यामागील आदर्शवादाची जाणीव आहे, परंतु त्यांना या सगळ्या हिंसाचाराची जाणीव झाली होती.
हेही वाचा : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी अर्जुन तेंडुलकरची खास पोस्ट
त्यामुळे त्यांनी त्यांच्या चित्रपट करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी समाजसेवा आणि गरिबांच्या कल्याणासाठी कार्य केले आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा नक्षलवादी कार्यकर्ता ते यशस्वी अभिनेता आणि राजकारणी हा प्रवास खरंच लक्षवेधी आहे.