दिशा पटाणीने विरोध करुनही टायगरने केले हे कृत्य

बॉलीवू़ड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. दोघेही सध्या श्रीलंकेत न्यू इयर वेकेशन एन्जोय करायला गेले आहेत. त्यांच्यासोबत रणवीर सिंहदेखील दिसला.

Updated: Jan 7, 2018, 11:02 AM IST
 दिशा पटाणीने विरोध करुनही टायगरने केले हे कृत्य  title=

नवी दिल्ली : बॉलीवू़ड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. दोघेही सध्या श्रीलंकेत न्यू इयर वेकेशन एन्जोय करायला गेले आहेत. त्यांच्यासोबत रणवीर सिंहदेखील दिसला.

यावेळी टायगर हा दिशाच्या गळ्यात माळा घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

माळ घालण्यास विरोध 

 

@tigerjackieshroff @dishapatani From set of #baaghi2 Get ready

A post shared by TIger shroff (@avadhut_wadikar) on

दोघेही गर्दीच्या ठिकाणी दिसत आहेत. ते एका स्टॉलवर जातात. टायगर तिथून एक माळ घेतो आणि दिशाच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करतो.

दिशा त्याला विरोध करते. टायगर ऐकत नाही आणि ती त्याला माळ घालण्यास देते. 

सिनेमा बागी २ च्या सेटवर

हा व्हिडिओ त्यांचा आगामी सिनेमा बागी २ च्या सेटवरचा आहे. हा सीनपण बहुदा फिल्मच्या शुटींगमधला आहे. यामध्ये टायगर खूप आनंदीत असलेला पाहायला मिळत आहे.

हा सिनेमा ३० मार्चला रिलीज होणार आहे. यामध्ये टायगर श्रॉफसोबत फर्स्ट पार्टमध्ये श्रद्धा कपूर होती पण दुसऱ्या पार्टमध्ये दिशा पटानी दिसणार आहे.