Diljit Dosanjh On Trolling : लोकप्रिय पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) हा सध्या त्याच्या एका परफॉर्मेंसमुळे चर्चेत आला आहे. दिलजीतनं 'कोचेला म्युझिक फेस्टिव्हल' मध्ये केलेल्या परफॉर्मेंसमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता दिलजीतनं त्याच्याविषयी खोटी बातमी पसरवत असणाऱ्यांसाठी सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केला आहे. सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर दिलजीत म्हणाला, जर तुम्हाला पंजाबी भाषा समजत नाही तर त्याचा चुकीचा अर्थ काढू नका आणि खोटी बातमी देखील पसरवू नका.
दिलजीतनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. मी म्हणालो हा माझ्या देशाचा झेंडा आहे. एह मेरे देश लई… म्हणजे माझा पर्फॉर्मन्स हा माझ्या देशासाठी आहे. जर पंजाबी येत नाही तर गूगल करा. कोचेला हा एक खूप मोठा म्युजिक फेस्टिव्हल आहे आणि येथे अनेक देशांतून लोक येतात त्यामुळे संगीत हे सर्वांसाठी आहे. जर कोणत्याही गोष्टीला दुसऱ्या बाजूनं पसरवायचं असेल तर ते कोणी तुमच्याकडून शिकायला हवं. याला देखील गूगल करा.
DON’T SPREAD FAKE NEWS & NEGATIVITY
Mai Kiha Eh Mere Desh Da Jhanda Hai Eh Mere Desh Lai.. Means MERI Eh Performance Mere desh Lai
Je Punjabi Nhi Aundi Tan Google Kar leya Karo Yaar…Kion ke Coachella Ek Big Musical Festival Aa Othey Har desh to log aunde ne.. that’s…
— DILJIT DOSANJH (@diljitdosanjh) April 25, 2023
दिलजीतला पाठिंबा देत अनेक नेटकरी समोर आले. त्यापैकी एक म्हणजे, भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. पूर्ण व्हिडीओ शेअर करणं सुरु केलं तर बरं होईल. दिलजीनं कॉन्सर्टमध्ये केलेला पर्फॉर्मन्स हा भारत आणि पंजाबला समर्पित केला. हे लज्जास्पद आहे की काही नेटकऱ्यांचा नकारात्मक अजेंडा आहे आणि द्वेष पसरवत आहेत.'
It would be better if @pun_fact starts posting complete video.@diljitdosanjh dedicated this concert to India and Punjab.
He said “eh mere Punjabi bhain bhraawan layi, mere desh da jhanda laike khadi aa kudi, eh mere desh layi, negativity ton bacho, music saareyan da saanjha”… https://t.co/afKl3xcGyS pic.twitter.com/p1mVnRw6BH— Manjinder Singh Sirsa (@mssirsa) April 25, 2023
फक्त मनजिंदर सिंग सिरसा हे समोर येऊन दिलजीतला पाठिंबा देत नव्हते तर त्यांच्यासोबत अनेक नेटकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणालास 'द्वेष करणाऱ्यांची काळजी करू नका.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तुझा अभिमान आहे. रॉकिंग राहा आणि भारताला अभिमान वाटावा. आमचं तुझ्यावर प्रेम आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, 'जय हिंद.'
Diljit Dosanjh accused a girl of inciting hatred by waving Indian flag during a music performance in America. He said "Don't spread hate, music belongs to everyone, not one country" @diljitdosanjh Do you have no respect for Indian tricolor?#diljit #tricolor #indianflag pic.twitter.com/2ODxwagP6K
— PunFact (@pun_fact) April 25, 2023
दरम्यान, दिलजीत दोसांझचं म्हणणं चुकीचं नव्हतं. पण काही लोकांनी त्याच्या वक्तव्यात फेरबदल करत दाखवले आहेत. एक नेटकरी म्हणाला, दिलजीत दोसांझनं अमेरिकेत एका म्युझिक पर्फॉर्मन्स दरम्यान, भारताचा झेंडा फडकावून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पुढे तो नेटकरी म्हणाला, द्वेष पसरवू नको, संगीत सगळ्यांचं आहे, कोणत्याही एका देशाचा नाही, दिलजीत दोसांझ तुझ्या मनात भारताच्या तिरंग्यासाठी सन्मान नाही का?
दिलजीतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बू यांच्यासोबत 'द क्रू'मध्ये दिसणार आहे.