मुंबई : नेही धुपिया आणि अंगद बेदीने आपल्या चाहत्यांना गुपचूप लग्न करून धक्काच दिला. सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा असताना अभिनेत्री नेहा धुपियाच्या लग्नाची बातमी हाती आहे. 10 मे रोजी अगदी जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत नेहा धुपियाने लग्न केलं. गेल्या 12 वर्षापासून बॉयफ्रेंड असलेल्या अंगदसोबत तिने केलं लग्न. दिल्लीतील वसंत विहार येथील गुरूद्वारामध्ये अगदी शिखपद्धतीने नेहा - अंगदने लग्न केलं.
मात्र आता दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की, नेहा - अंगदच्या असं घाईत लग्न करण्यामागे काहीतरी खास कारण आहे. ते कारण म्हणजे नेहा धुपिया गरोदर असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळेच नेहा आणि अंगदने इतक्या घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहा धुपियाचे वडिल प्रदीप धुपिया यांनी नेहा गरोदर असल्याच्या बातमीबाबत दैनिक भास्करशी एक महत्वाची गोष्ट सांगितली. नेहा गरोदर असल्याची बातमी खोटी आहे. त्या दोघांनी अतिशय गुपचूप लग्न करण्याचा हा हेतू नाही असं देखील ते म्हणाले.
नेहा आणि अंगदने मीडिया आणि सगळ्या सहकलाकारांपासून आपल्या लग्नाची बाब लपवली. त्या दोघांना अगदी साधेपद्धतीने आपला हा खास सोहळा साजरा करायचा होता. मीडिया आणि इतर बॉलिवूड कलाकारांपासून त्यांना ही गोष्ट शेअर करायची नव्हती. नेहा आणि अंगद खूप चांगले मित्र आहेत. आणि आम्हाला या दोघांनी लग्न करावं असं वाटत होतं. आता त्यांनी लग्न केलं आहे तर आम्ही खूप खूष असल्याच देखील त्यांनी सांगितलं.