करण जोहरकडून कार्तिक आर्यनला ब्लॅकलिस्ट! कधीच करणार न करण्याचा निश्चय

कार्तिक आर्यनच्या करिअरच्या यावेळी घडली ही घटना 

Updated: Apr 16, 2021, 03:45 PM IST
करण जोहरकडून कार्तिक आर्यनला ब्लॅकलिस्ट! कधीच करणार न करण्याचा निश्चय  title=

मुंबई : 'आकाशवाणी', 'कांची' आणि 'लव आज कल' सारखे सुपरफ्लॉप सिनेमे देणारे आणि वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारा अभिनेता कार्तिक आर्यनला करण जोहरने मोठा झटका दिला आहे. करण जोहरने कार्तिकला आपल्या आगामी सिनेमा 'दोस्ताना 2' मधून ब्लॅकलिस्ट केलं आहे. (Did Karan Johar reject Kartik Aaryan for ‘Dostana 2’?) एवढंच नव्हे तर कार्तिकला आपण पुढे आयुष्यात कधीच काम देणार नाही असं म्हटलं आहे. धर्मा प्रोडक्शनने कार्तिक आर्यन करता आपले दरवाजे कायमचे बंद केले आहेत. 

2018 मध्ये करण जोहरच्या 'दोस्ताना 2' मध्ये लीड रोल करता अभिनेता कार्तिक आर्यनला निवडण्यात आलं होतं. मात्र आता त्याला रिप्लेस करण्यात आलं आहे. 2008 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाचा हा सीक्वल आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात लीड रोल करता जान्हवी कपूरला देखील फायनल केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

मिळालेल्या माहितीनुसार, 20 दिवसांचं शूट केल्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यनने पुढच्या तारखा देण्यास नकार दिला आहे. त्याच्याकडे खूप काम आहे आणि वेळ नसल्याच सांगत त्याने शूट रद्द केलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक आर्यनला या सिनेमाची स्क्रिप्ट आवडली नाही. क्रिएटीव समस्याच्या कारणामुळे त्याच्यात आणि दिग्दर्शकामध्ये थोडे खटके उडाले. 

करण जोहर आणि त्याच्या टीमला ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी आगामी सिनेमा करता कार्तिकसोबत काम करण्यास नकार दिला. आता कार्तिकच्या जागेवर कोण काम करणार अशी चर्चा रंगली आहे.