Dharmendra Deol यांचा नातू बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

धर्मेंद्र यांनी राजवीरला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Mar 31, 2021, 06:52 PM IST
Dharmendra Deol यांचा नातू बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज title=

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र देओलचा नातू आणि सनी देओलचा मुलगा राजवीर देओल (Rajveer Deol)बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या माध्यमातून राजवीर त्याच्या अभिनयाला सुरूवात करणार आहे. राजवीरचा पहिला सिनेमा प्रेम कथे भोवती फिरणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अवनीश एस. बडजात्याच्या खांद्यावर आहे. खुद्द धर्मेंद्र यांनी राजवीरला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

धर्मेंद्र ट्विट करत म्हणाले, 'माझा नातू राजवीर देओल, अवनीश बडजात्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करोत, जसं तुम्ही मला प्रेम दिलं. तसचं माझ्या नातूला द्या' असं म्हणतं त्यांनी राजवीरला आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आता धर्मेंद्र यांचा नातू त्यांच्याप्रमाणे प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सनी देओने देखील त्याच्या मुलाला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझा मुलगा राजवीर एक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये सुरुवात करत आहे. राजश्री प्रोडक्शनच्या रोमँटीक लव्ह स्टोरी असलेल्या चित्रपटात राजवीर झळकणार आहे.' असं सांगत सनीने मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. 

सनी देओल यांचा मोठा मुलगा करण देओल यांनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. 'पल पल दिल के पास' या सिनेमातून करणने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. पण त्याचा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास असमर्थ ठरला. त्यामुळे देओल कुटुंबाचा  दुसरा नातू चाहत्यांच्या पसंतीस पडतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.