'एक नवा खेळ सुरू... ', देवमाणूस 2 मालिकेत मोठा ट्विस्ट

'एका नव्या जीवघेण्या खेळाची सुरुवात...' देवमाणूस 2 मालिकेत मोठा ट्विस्ट

Updated: Dec 28, 2021, 08:22 PM IST
'एक नवा खेळ सुरू... ', देवमाणूस 2 मालिकेत मोठा ट्विस्ट title=

मुंबई: देवमाणूस मालिका खूप गाजली. देवमाणूस मालिका खूप लोकप्रिय झाली. याच लोकप्रियतेमुळे त्याचा दुसरा भाग आणला. देवमाणूस 2 ही मालिका सुरू होऊ नुकताच आठवडा झाला असावा तोच यामध्ये एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. गावासाठी देवमाणूस म्हणून असलेला डॉक्टर खूनी आहे यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. 

पुराव्या अभावी सुटलेला डॉक्टर पुन्हा एकदा गावात आला. तो डॉक्टर नाही आणि त्याने भलत्याच व्यक्तीचं सोंग घेतलं. ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये कोणताही संशय निर्माण होऊ नये. ही त्याची चाल होती. मात्र डिंपलला पहिल्यापासूनच संशय होता. डिंपल हा व्यक्ती डॉक्टर कसा आहे हे त्याच्या बायकोला पटवून देते. 

या सगळ्या प्रकरणात देवमाणूस 2 मध्ये पहिला बळी कोणाचा जाणार याची ग्राहकांना उत्सुकता होती. आता तोच डॉक्टर पुन्हा मालिकेत परतला आहे. या डॉक्टरने आपल्या पत्नीची हत्या केली आणि आता तो डॉक्टर म्हणून पुन्हा गावात येणार का? याची उत्सुकता आहे.  

डॉक्टर डिंपलला पुन्हा आपली बायको म्हणून स्वीकारणार का? डॉक्टर पुन्हा गावात आल्यानंतर आता काय असणार ग्रामस्थांची प्रतिक्रिया अशा सगळ्याच गोष्टी या मालिकेची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. 

झी मराठीवर सध्या एक प्रोमो सुरू आहे. या प्रोमोमध्ये डॉ अजित कुमार नदीमधून अंघोळ करून बाहेर येतो. त्याला पाहून टोण्या आईला डॉक्टर परत आल्याचं सांगतो. आता हा डॉक्टर आरशात पाहून आजपासून एक नवा खेळ सुरू असं म्हणताना दिसत आहे. 

डॉक्टर स्मृती विसरून गावात आलाय खरा पण त्याचा नक्की प्लॅन काय? डिंपला तो आपली पत्नी म्हणून फोटो पाहिल्यावर स्वीकारेल का? काय असणार मालिकेतील पुढचा ट्वीस्ट हे पाहाणं आणखी रंजक असणार आहे.