'या' बोल्ड ड्रेससाठी मलायका जितके पैसे खर्च करते तितक्यात तुम्ही एक कार खरेदी कराल

तिच्या या लूकची बरीच चर्चा झाली. 

Updated: Dec 28, 2021, 05:57 PM IST
'या' बोल्ड ड्रेससाठी मलायका जितके पैसे खर्च करते तितक्यात तुम्ही एक कार खरेदी कराल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या विविध सेलिब्रिटींच्या घरी ख्रिसमस पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे. नुकतीच अभिनेत्री करिष्मा कपूर हिच्याही घरी अशाच पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिथं काही सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. 

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिसुद्धा तिचा प्रियकर अभिनेता अर्जुन कपूर याच्यासोबत पोहोचली. 

पार्टीसाठी मलायकानं जो लूक केला होता, त्याची यावेळी बरीच चर्चा झाली. वेलवेटचं ब्रालेट, त्यासह हॉट शॉर्ट आणि वेल्वेटचंच श्रग अशा आऊटफीटवर तिनं भरदिला होता.

समोरच्या बाजुनं खुल्या असणाऱ्या श्रगमुळं मलायकाची फिट फिगरही सर्वांच्या नजरा वेधत होती. तिच्या या लूकची बरीच चर्चा झाली. 

आता जर तुम्हालाही तिच्यासारखाच लूक करायचा असेल, तर तिनं मोजलीये इतकी किंमत मोजावी लागेल. 

मलायकानं तिच्या या लूकसाठी जवळपास 2.45 लाख इतका खर्च केल्याचं म्हटलं जात आहे. 

Gucci या ब्रँडला तिनं यावेळी प्राधान्य दिलं होतं. या आउटफिटसोबत असणाऱ्या श्रगची किंमत सांगावी तर ती, 1,48,276 रुपये इतकी असल्याचं ऑनलाईन पोर्टलवर दिसत आहे. 

सोबतच शोभणाऱ्या Gucci शॉर्ट्सची किंमत 97,353 इतकी आहे. ही किंमत जोडली असता हा आकडा 2.45 लाख रुपये इतका होत आहे. 

मलायकाच्या कपज्यांच्या किंमतीनं तुम्हाला धक्का दिला असेल तर, थांबा आणखी एक धक्का बाकी आहे. 

कारण, या लूकला साजेशी पर्सही तिनं सोबत बाळगली होती. तिच्या क्लचवर सापाचं डिझाईन होतं. याची किंमत 1695 डॉलर म्हणजेच 1,26,933 रुपये इतकी होती. 

थोडक्यात काय, तर मलायकाच्या या संपूर्ण लूकची किंमत 3 लाख 70 हजार रुपये इतकी होती. 

मलायकानं कपड्यांसाठी मोजलेली ही किंमत पाहता, त्यामध्ये एखाद्या कारचं बेस मॉडेल सर्वसामान्य नागरिक खरेदी करु शकतात, हे नाकारता येणार नाही.