दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड निहार घेणार या गायिकेसोबत सातफेरे

दीपिकाचा एक्स  बॉयफ्रेंड लग्नाच्या बेडीत अडकणार

Updated: Jan 17, 2019, 08:23 AM IST
दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड निहार घेणार या गायिकेसोबत सातफेरे title=

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तो प्रसिद्ध गायिका निती मोहन हिच्यासोबत सातफेरे घेणार आहे. यापूर्वी निहार हा दीपिकासोबत असलेल्या घनिष्ट मैत्रीमुळे चर्चेत होता. तो दीपिकाला डेट करत असल्याच्या बातम्याही येत होत्या. त्यामुळे दीपिका-निहार सतत चर्चेत असाची. दीपिकाचे लग्न रणवीर सिंग याच्यासोबत झाले. त्यामुळे निहार पांड्या पुढे काय करणार याची उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. तो लग्नाच्या बेडीत अडकत आहे.

सोशल मीडियाच्या वृत्तानुसार निहार हा निती मोहन हिला डेट करत होता. अनेक दिवसांपासून ते एकमेकांसोबत दिसत होते. अखेर निहार याने नितीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही. मात्र, 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार ते एक महिन्यानंतर लग्न करण्याची शक्यता आहे. मात्र, या जोडीची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

निहार आणि निती यांच्या लग्नाची बातमी फुटली तरी दोघांनी याबाबत भाष्य केलेले नाही. त्यांनी याची अत्यंत गुप्तता पाळली आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाला अधिकृत दुजोरा मिळत नाही. निती ही बॉलिवूडमधील पार्श्वगायिका आहे. तिने अनेक गाणी गायली आहेत. तिची गाण्यांना तरुणांची चांगली पसंती मिळत आहे. 

निहार अणि निती सोसल मीडियावर जास्त ॲक्टीव्ह आहेत. सोशल मीडियावर त्यांनी कधीही दोघांचा फोटो शेअर केलेला नाही. ते त्याबाबत सर्तक आहेत. मात्र अनेकवेळा निहार हा नितीच्या बहिणींसोबत फोटो सोसल मिडियावर शेअर करताना दिसत आहे. मात्र, या  फोटोत निती नसते, याचीही चर्चा सुरु आहे. याबाबत निती पत्रकार परिषदमध्ये निहार आणि तिच्या लग्नाबद्दल काहीही भाष्य करत नाही.