'पद्मावती'तल्या दीपिकाच्या त्या ड्रेसची किंमत माहीत आहे का?

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावती' हा सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलाय... मग ते सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झालेली तोडफोड असो किंवा 'घुमर' हे गाणं असो...

Updated: Oct 28, 2017, 08:54 PM IST
'पद्मावती'तल्या दीपिकाच्या त्या ड्रेसची किंमत माहीत आहे का? title=

मुंबई : संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावती' हा सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलाय... मग ते सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी झालेली तोडफोड असो किंवा 'घुमर' हे गाणं असो...

उल्लेखनीय म्हणजे, दीपिकानं 'घुमर रे' या गाण्यात परिधान केलेला घागराही सध्या चर्चेत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात दीपिकानं 'घुमर' या गाण्याच्या चित्रिकरणा दरम्यान जो ड्रेस वापरलाय त्याची किंमत ३० लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. 

सिनेमात राणी पद्मिनीची भूमिका निभावणाऱ्या दीपिकाचा लूक प्रेक्षकांना भलताच पसंत पडलाय. 'घुमर' या गाण्यात दीपिका राजस्थानी डान्स करताना दिसतेय. 

या गाण्यासाठी विशेष असा ड्रेस डिझाईन करून घेण्यात आलेला दिसतोय. 'घुमर' या गाण्याला यूट्युबवर केवळ २४ तासांत एक करोडहून अधिक ह्यूज मिळालेत. हा सिनेमा १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.