दीपिका पदुकोण पर्समध्ये ठेवते 'या' गोष्टी; हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी घेते 'हे' औषधं

अनेकदा मुली आपल्या पर्समध्ये पैशाचं पाकीट, काही मेकअपचे सामान, स्टोल आणि काही हलक्या वस्तू ठेवतात.

Updated: Jun 10, 2022, 09:36 PM IST
दीपिका पदुकोण पर्समध्ये ठेवते 'या' गोष्टी; हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी घेते 'हे' औषधं title=

मुंबई : अनेकदा मुली आपल्या पर्समध्ये पैशाचं पाकीट, काही मेकअपचे सामान, स्टोल आणि काही हलक्या वस्तू ठेवतात, पण बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या पर्समध्ये अशा गोष्टी ठेवते, की पाहून तुम्हीही चक्रावून जाल. दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्वतः तिच्या पर्समध्ये ठेवलेल्या गोष्टींबद्दल चाहत्यांना सांगत आहे.

दीपिका तिच्या बॅगेत काय ठेवते हे मोठ्या उत्साहाने चाहत्यांना दाखवत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हँगओव्हर काढण्यापासून ते मीटिंगला उपस्थित राहण्यापर्यंत सर्व काही अभिनेत्रीच्या बॅगेत असतं. दीपिकाच्या बॅगेत काय असतं ते जाणून घेवूयात?

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ती सगळ्यात आधी सनग्लासेस काढते, जी ती थकली असताना किंवा तिला थोडे ग्लॅमरस दिसण्यासाठी वापरते. अभिनेत्रीच्या पर्समध्ये एक डायरी आणि एक पेन्सिल आहे. ज्याचा वापर ती महत्त्वाच्या कामाच्या नोट्स बनवण्यासाठी करते जेणेकरून ते लक्षात राहतं.

याशिवाय दीपिकाच्या बॅगेत तिच्या घराच्या चाव्या, लॅपटॉप, मोबाईल स्टँड, एअरलाइन कार्ड, फेस स्प्रे/फेस मिस्ट, परफ्यूम, हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी औषध, माऊथ फ्रेशनर, केस बांधण्यासाठी रबरबँड, अडॅप्टर, सेफ्टी पिन, बँडेज होतं. हँगओव्हरपासून सुटका मिळवण्यासाठी दीपिका कोणतं औषध वापरते हे तुम्हीच पहा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ शेअर करताना दीपिकाने एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले 'जे मला ओळखतात, त्यांना माहित आहे की मी खरंच माझं संपूर्ण घर माझ्या बॅगमध्ये घेऊन फिरते'.