दीपिकाने लक्ष्मी अग्रवालसह घेतला जेवणाचा आस्वाद

अभेनेत्री दीपिका पादुकोन  'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Updated: Apr 24, 2019, 10:15 AM IST
दीपिकाने लक्ष्मी अग्रवालसह घेतला जेवणाचा आस्वाद  title=

मुंबई : अभेनेत्री दीपिका पादुकोन  'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच तिने अॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालसह दुपारच्या जेवणाचा आस्वाद  घेतल्याचे समोर येत आहे. दीपिकाने 'छपाक' चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे. २५ मार्च रोजी दिल्लीत चित्रपटाच्या शुटिंग सुरू केली होती.

ऑसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या काही कठीण प्रसंगावर बेतलेला हा चित्रपट आहे. ऑसिड हल्ला होवूनही आयुष्य स्वछंदीपणे जगणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीच्या आयुष्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोनच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे. १० जानेवरी २०२०ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे अभिनेता अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सुध्दा  १० जानेवरी २०२० ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.