दीपिका पादुकोणचा Kissing सीन पाहून घरच्यांना धक्का, म्हणाले, तू कसं हे केलंस....

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत होता.

Updated: Feb 20, 2022, 07:38 PM IST
  दीपिका पादुकोणचा Kissing सीन पाहून घरच्यांना धक्का, म्हणाले, तू कसं हे केलंस.... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या गहराईया सिनेमामुळे खूपच चर्चेत आहे. तिने दिलेल्या बोल्ड सीनची खूपच चर्चा होत आहे. दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचे इंटीमेट सीन खूपच व्हायरल होत आहे.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत होता. कारण या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच दीपिका बोल्ड सीन करताना दिसणार होती.



सिनेमाच्या प्रमोशनवेळी दीपिकाने अनेक मुलाखती केल्या. त्यातीलच एका मुलाखतीत तिने या सिनेमाचा ट्रेलर पहिल्यानंतर कुटुंबियांची काय प्रतिक्रिया मिळाली याबाबत सांगितलं आहे.



दीपिकाची बहिण 'गहराईया' या सिनेमाचा ट्रेलर पाहून काय म्हणाली, याबाबत देखील तिने खुलासा केला आहे. दीपिका म्हणाली, "घरच्यांनी हा सिनेमा पाहिला तेव्हा सुरुवातीला त्यांना धक्काच बसला होता. की मी हा असा रोल कसा काय केला?

पुढे ती म्हणाली, "त्यांनी मला अशा भूमिकेत पहिल्यांदाच पहिलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी ही नवं होतं. त्यांनी माझ्या कामाचं आणि भूमिकेचं कौतुक केलं. आणि सगळेच चकीतहोते."



दीपिकाला रणवीरच्या प्रतिक्रियेबद्दल देखील विचारण्यात आलं. यावर ती म्हणाली, त्याला माझा अभिमान वाटतो, त्याला माझं पात्र खूप आवडलं. त्याला माझा परफॉर्मन्स ही आवडला आहे.