Deepika Padukone Buys New Property : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 8 सप्टेंबर रोजी लेकीला जन्म दिला. त्यानंतर तिनं आणि रणवीरनं त्यांच्या नव्या घरात लेकीचं स्वागत केलं. त्यानंतर आता दीपिकानं तिची सासू अंजू भवनानीच्या घराच्या बाजूला नवा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट दीपिकाच्या कंपनीच्या नावावर खरेदी करण्यात आला आहे. तिच्या या कंपनीचे को-ओनर तिचे वडील प्रकाश पदुकोण आहेत. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे दीपिकानं जी संपत्ती खरेदी केली आहे ती तिची सासू अंजू भवनानीनं खरेदी केलेल्या फ्लॅटच्या अगदी शेजारी आहे. त्यांनी हा फ्लॅट त्यांची लेक रितिका आणि तिचा नवरा जुगजीत सिंग भावनानीला भाडेतत्वावर दिला आहे.
दीपिकानं हा नवा फ्लॅट सागर रेशम कॉर्पोरेटिंग हाउसिंग सोसायटीमध्ये घेतला आहे. या सोसायटीमध्ये 4 बीएचके आणि 5 बीएचके अपार्टमेंट सहभागी आहेत. दीपिकाचा फ्लॅट 15 व्या मजल्यावर आहे. Zapkey.com नं दिलेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टीसाठी 1.7 कोटींची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी 30,000 रुपये मोजले आहेत. 171.47 स्क्वेअर मीटरमध्ये असलेल्या या अपार्टमेंटची किंमत ही 17.8 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं 8 सप्टेंबर रोजी लेकीच्या जन्मानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वेलकम बेबी गर्ल अशी पोस्ट शेअर केली होती. दीपिका रविवारी 15 सप्टेंबर रोजी दुपारी रुग्णालयातून घरी आली. रणवीरनं त्याच्या दोन्ही लक्ष्मींचं घरात स्वागत केलं आहे. त्यावेळी दीपिका आणि तिच्या लेकीनं पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. पापाराझींनी त्यांच्या लेकीचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण गाडी इतक्या पटकन गेली की त्यांना फोटो काढता आले नाही. जेव्हा दीपिका रुग्णालयात होती तेव्हा दोघाचं कुटुंब त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचलं होतं. दीपिका-रणबीर आणि त्यांच्या लेकीला रुग्णालयात भेटण्यासाठी तिचे काही जवळचे लोक अर्थात शाहरुख खान, मुकेश अंबानी, अनंत आणि राधिका देखील पोहोचले होते.
हेही वाचा : सलमान खानच्या वडिलांना पुन्हा धमकी! स्कूटीवरुन बुरख्यात आलेली महिला म्हणाली, 'लॉरेन्स बिश्नोई को...'
त्यानंतर घरी परतलेल्या दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये लिहिलं की 'फीड.बर्प.स्लीप.रिपीट'. दीपिकानं तिच्या बायोमध्ये केलेला हा बदल तिच्या चाहत्यांना खूप आवडला. रणवीर आणि दीपिकानं आतापर्यंत तिच्या मुलाच्या नावाची घोषणा केलेली नाही. या सगळ्यात रणवीरचा एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत रणवीरनं मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.