बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय आजही आशिकी चित्रपटामुळे ओळखला जातो. सपने साजन के, फिर तेरही कहानी याद आयी या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे. पण तुम्हाला राहुल रॉयच्या ब्रह्मचारी बहिणीबद्दल माहिती आहे का? प्रियांका रॉय असं त्याच्या बहिणीचं नाव असून मॉडेलिंग सोडून तिने ब्रह्मचैर्य स्विकारलं आहे. तिला हरी माँ या नावानेही ओळखलं जातं. नुकतंच राहुल रॉयने आपली बहीण हरी माँ सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हरी माँने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो शेअर केला आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रती कृतज्ञता," अशी कॅप्शन तिने फोटोला दिली आहे. यावेळी तिने #meeknathshinde Ram ram #harimaapriyanka #harimaa #cmmaharashtra #eknathshinde #chiefministerofmaharashtra हे हॅशटॅग वापरले आहेत.
तिच्या YouTube बायोनुसार, ती एक ब्रह्मचारिणी (ब्रह्मचारी) आहे. अव्यवसायिक गूढवादी तसंच आध्यात्मिक गाणी लिहिणारी आणि बोलणारी तत्त्वज्ञ आहे. ती पूर्वी एक मॉडेल आणि उद्योजक होती. तिने मार्शल आर्ट्स आणि नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. ती फिटनेस ट्रेनर देखील होती. हरी माँने आपण आचारी, एक मानवतावादी, एक पर्यावरणवादी आणि शाकाहारी कार्यकर्ती असल्याचंही लिहिलं आहे. तिच्या बायोमध्येही तिचं एक वाक्य आहे, 'प्राणी देखील एक व्यक्ती आहे'. प्रियांका उर्फ हरी माँ अनेक वर्षे मॉडेल होती. तिला मॉडेल म्हणून दाखवणारी तिची शेवटची पोस्ट तिच्या लग्नापूर्वी 2020 मध्ये होती.
तिने 7 ऑगस्ट 2020 रोजी रोमीर सेनशी लग्न केले. लग्नाच्या एक दिवस आधी तिने इंस्टाग्रामवर रोमीरसोबतचा एक फोटो पोस्ट केला. "माझ्या नवऱ्याची @romeersen म्हणून ओळख करून देताना मला मोठा सन्मान वाटत आहे. उद्या आपण लग्नाची गाठ बांधत आहोत. आपण आपल्या मागील जन्मात अनेकदा गाठी बांधल्या असतील. हे प्रेम शब्दांनी दूषित होत नाही. त्याच्याच देवत्व टिकवून ठेवण्याची अंगभूत शक्ती आहे... लग्न करुन पुन्हा येत आहे", असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
प्रियंका ही राहुलची मानलेली बहीण आहे. तिच्या वडिलांचे नाव दिवंगत प्रलोय बागची रॉय आहे, तर आईचे नाव लिली बागची आहे. तिला एक भाऊ सत्यजित रॉय देखील आहे. राहुलच्या वडिलांचे नाव दीपक रॉय आणि आईचे नाव इंदिरा रॉय आहे. त्याला रोहित रॉय नावाचा भाऊ आहे.
गतवर्षी, राहुलने प्रियांकासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट आणि फोटो शेअर केला होता. यामध्ये त्याने लिहिलं होतं की, "हरी माँ तुझं घरी स्वागत आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. गेली 57 वर्षे मी जगत असलेली माझी जिद्द आणि माझी वेगळी जीवनशैली स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. तू फक्त एक बहीण नाही तर एक आई सुद्धा आहेस... मी कोणत्याही आर्थिक गरजांना कोणत्याही प्रकारे मदत करत नाही तरीही तू माझ्या पाठीशी उभी आहेस आणि संपूर्ण घर अखंडपणे चालवत आहेस".