दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

एकमेव भारतीय अभिनेत्री म्हणून दीपिकाची कामगिरी   

Updated: Oct 4, 2019, 05:12 PM IST
दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या अभिनय कौशल्यासोबतच ती तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत आहे. तिच्या लोकप्रियतेत देखील दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. ती एक ग्लोबल आयकॉन अभिनेत्री ठरली आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाने यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 'बिझनेस ऑफ फॅशन ५००' मध्ये एकमेव भारतीय अभिनेत्री म्हणून दीपिकाने आणखी एक कामगिरी केली आहे.

चाहत्यांना आपल्या अभिनयाने घायाळ करणारी दीपिका २०१८ मध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सामिल झाली होती. सर्वात जास्त मानधन स्विकारणाऱ्या अभिनेत्रींपैकी दीपिका एक आहे. अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ओळख निर्माण केलेल्या दीपिकाचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत.

दीपिका लवकरच 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमातून एक सत्य घटना रूपेरी पडद्यावर साकारणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोनच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे. १० जानेवरी २०२० ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.