दीपिका आणि राजकुमार राव लवकरच या सिनेमात एकत्र दिसणार

या बायोपिकमध्ये दीपिका आणि राजकुमार राव एकत्र दिसणार

Updated: Dec 16, 2018, 01:48 PM IST
दीपिका आणि राजकुमार राव लवकरच या सिनेमात एकत्र दिसणार title=

मुंबई : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण आणि बॉलिवूडचा दमदार अॅक्टर राजकुमार लवकरच एकत्र दिसणार आहेत. अॅसिड पीडित महिला लक्ष्मी अग्रवालच्या बायोपिकमध्ये दीपिका आणि राजकुमार राव एकत्र काम करणार आहेत. हा सिनेमा दीपिका पादुकोणच्या प्रोडक्शन हाउसच्या बॅनरखालीच बनणार आहे. मेघना गुलजार या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. रिपोर्ट्सनुसार दीपिका आणि मेघना या सिनेमाच्या लीड रोलसाठी एका अभिनेत्याची अनेक दिवसांपासून शोध घेत होते. दीपिकाच्या विरुद्ध राजकुमार हा परफेक्ट बसेल असं ठरल्यानंतर राजकुमारची या सिनेमासाठी निवड झाली. पण राजकुमार रावचा सिनेमात नेमका रोल काय असेल हे अजून पुढे आलेलं नाही. 

पुढच्या महिन्यापासून या सिनेमाचं शुटींग सुरु होणार आहे. दोघांनाही या सिनेमाची स्क्रिप्ट फारच आवडली आहे. लक्ष्मीला जेव्हा या सिनेमाबद्दल सांगण्यात आलं तेव्हा तिने म्हटलं की, मला खूप आनंद आहे की दीपिका हा रोल करणार आहे. लक्ष्मीने म्हटलं की, दीपिकाला ती जज नाही करु शकत पण तिला विश्वास आहे की ती हा रोल खूप चांगल्या प्रकार करेल. लक्ष्मीने मेघना गुलजार आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

लग्नानंतर दीपिकाचा हा पहिला सिनेमा आहे. दीपिकाने करण जोहरचे 3 सिनेमे देखील साईन केल्या आहेत. रणबीर कपूर आणि रणवीर सिंह सोबत ती या सिनेमात काम करणार आहे. संजय लीला भंसाली पुन्हा एकदा कॉस्ट्यूम ड्रामा सिनेमा बनवण्याचा विचार करत आहेत. या सिनेमात देखील रणवीर-दीपिका एकत्र दिसू शकतात.