दीप सिद्धूच्या मृत्यूबाबत पोलिसांकडे मोठा पुरावा, हत्या की अपघात?

शेतकरी आंदोलनात सक्रीय होता अभिनेता दीप सिद्धू 

Updated: Feb 18, 2022, 09:04 AM IST
दीप सिद्धूच्या मृत्यूबाबत पोलिसांकडे मोठा पुरावा, हत्या की अपघात?  title=

मुंबई : गेल्यावर्षी स्वातंत्र्य दिना दिवशी (Republic Day) दिल्लीत लाल किल्ल्याजवळ हिंसा झाली. या हिसेंतील मुख्य आरोपी आणि पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) चा मंगळवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणात हरयाणा पोलिसांना मोठा पुरावा हाती लागला आहे. (Deep Sidhu Accident Case : Police arrested truck driver ) दिप सिद्धूचा ज्या ट्रकसोबत अपघात झाला होता. त्या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

हरयाणाचा राहणारा ट्रक चालक 

आरोपी ट्रक चालकाचे नाव कासिम आहे. तो हरयाणाच्या नहू परिसरात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेनंतर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. चालकाला आज न्यायालयात सादर करणार आहे. 

ट्रक आणि एसयूवीचा मोठा अपघात 

दीप सिद्धूचा अपघात हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा परिसरात कुंडली - मानेसर- पलवल राजमार्गावर झाला. जेथे सिद्धूची एसयूवी ट्रकला धडकली होती. या अपघातात दीप सिद्धूचा मृत्यू झाला. 

गर्लफ्रेंडची भावनिक पोस्ट 

'आपण आपल्या भविष्यासाठी खूप काही ठरवलं होतं... पण तू निघून गेलास... तुझ्या शिवाय मी कशी जगू.. ' आपण ज्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करतो... त्याचा डोळ्यादेखत मृत्यू पाहिल्यानंतर त्या व्यक्तीची परिस्थिती कशी असेल... या गोष्टीचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. मंगळवारी  पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा दिल्ली सीमेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रीना रायने सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं...

पोस्टमध्ये रीना म्हणते, 'मी आता एकटी झाली आहे... मला वचन दिलं होतंस, की तू मला आयुष्यात कधी सोडून जाणार नाही.. मी जेव्हा रुग्णालयात होते तेव्हा मला भास झाला... तू माझ्या कानात 'आय लव्ह यू...' म्हणून गेलास...'