ये हालो! 'तारक मेहता' शो मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकप्रिय टीव्ही शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Updated: Jun 17, 2022, 08:14 PM IST
ये हालो! 'तारक मेहता' शो मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा लोकप्रिय टीव्ही शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. हा शो कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहिला असला तरी गेल्या चार वर्षांपासून या शोमधील एका व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे 'दयाबेन'ची.
 
दयाबेन बनून सर्वांची मने जिंकणाऱ्या दिशा वकानीने काही वर्षांपूर्वी या शोला निरोप दिला होता. त्यानंतर आजपर्यंत प्रेक्षक तिच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. यादरम्यान अनेक अभिनेत्रींची नावंही समोर आली आहेत. पण दयाबेन शोमध्ये परतली नाही. पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती व्यक्तिरेखा 'दयाबेन' चार वर्षांनंतर या शोमध्ये दिसणार आहे. मात्र, दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी एक नवीन नाव पुढे येत आहे.

सुत्रांनुसार, 90 च्या दशकातील हिट मालिका 'हम पांच' मधील तिच्या प्रतिष्ठित पात्र स्वीटी माथूरसाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री राखी विजान हिला दयाबेनच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. निर्माता असित कुमार मोदी यांनी अलीकडेच मीडियाला माहिती दिली होती की, प्रसिद्ध पात्र कथेत परत येणार आहे. परंतु 'दयाबेन' ची भूमिका करणारी दिशा वकानी पुनरागमनाची पुष्टी करू शकत नाही.

एका सूत्राने सांगितले की, 'दयाबेनची भूमिका करण्यासाठी राखी विजानला संपर्क करण्यात आला आहे. राखी ही सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचं कॉमेडी टायमिंग चांगली आहे. दिशी वकानी यांनी सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटीसाठी ब्रेक घेतला आणि ती परत आलीच नाही.