'दंगल' फेम अभिनेत्रीचे वयाच्या 19व्या वर्षी निधन, औषधांमुळे गमावला जीव

Suhani Bhatnagar Death: दंगल चित्रपटात आमिर खानच्या धाकट्या लेकीची भूमिका साकारणारी सुहानी भटनागर हिचे आकस्मात निधन झाले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 17, 2024, 02:56 PM IST
 'दंगल' फेम अभिनेत्रीचे वयाच्या 19व्या वर्षी निधन, औषधांमुळे गमावला जीव title=
dangal girl suhani bhatnagar passes away at the age of 19

Suhani Bhatnagar Death: मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आमिर खानची ब्लॉकब्लास्टर चित्रपट दंगलमध्ये बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाले आहे. वयाच्या 19व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. ज्युनीयर बबीता फोगट ची भूमिका तिने साकारली होती. सहुानीच्या मृत्यूनंतर सिनेविश्वात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सुहानी गेल्या कित्येत दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मात्र, ती उपचारांना काहीच प्रतिसाद देत नव्हती. अखेर 17 फेब्रुवारी 2024 रोजी सुहानीचे निधन झाले. सुहानीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या आई-वडिल रडून रडून बेहाल झाले आहेत. सुहानी तिच्या कुटुंबीयांसह फरिदाबाद येथे राहत होती. शनिवारी सकाळीच तिचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्यावर अजरोंदा स्वर्ग आश्रममध्ये अत्यंसंस्कार करण्यात येतील. 

काही दिवसांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्या वर उपचार सुरू असताना तिला काही औषधे देण्यात आली होती. मात्र, याच औषधांची रिअॅक्शन झाली. सुहानीच्या संपूर्ण शरीरात पाणी साचले. शरीरात पाणी भरल्यामुळं तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. 

दंगल चित्रपटात सुहानीने आमिर खानची धाकटी मुलगी ज्युनिअर बबीता फोगाटची भूमिका साकारली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त ती अनेक टिव्ही जाहिरातींमध्ये दिसून आली होती. मात्र, त्यानंतर तिनी सिनेक्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. व अभ्यासावर पूर्णपणे लक्ष्य केंद्रित केले होते. तिने तिच्या अनेक मुलाखतीतदेखील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच चित्रपटात पुन्हा काम करेल, असं म्हटलं होतं. 

सुहानी सोशल मीडियावरदेखील जास्त अॅक्टिव्ह नव्हती. तिची शेवटची पोस्ट 25 नोव्हेंबर 2021 रोजी केली होती. या फोटोंमध्ये सुहानीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोकही आश्चर्यचकित झाले होते. तिच्या लूक्सची चर्चाही होत होती.