मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' सिझन 10 ची सुरूवात 4 सप्टेंबर 2018 मध्ये झाली. या शोच्या अगदी सुरूवातीपासूनच हा चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धक या सिझनमधून बक्षिस जिंकले आहेत पण कुणीच करोड रुपये जिंकले नव्हते. मात्र आता प्रेक्षक लवकरच एका करोडपती विनर स्पर्धकाला भेटणार आहेत.
येणाऱ्या शोच्या टिझरमधून हे कळलं आहे की, एक महिला या शोमधून करोडपती झाली आहे. हे टीझर पाहता लक्षात आलं आहे की, आसाममध्ये राहणारी दोन मुलांची आई बिनीता जैन 13 व्या प्रश्नाचं उत्तर देऊन एक करोड जिंकते. या क्षणाचा आनंद बिनीता यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हा एपिसोड 2 ऑक्टोबर 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. बिनीता 7 करोड रुपये आपल्या नावे करणार आहे.
कौन बनेगा करोडपती सिझन 10 मध्ये दोन स्पर्धकांनी सर्वात जास्त राशी जिंकल्या आहेत. यामध्ये भागलपूरचे टिकिट चेकर सोमेश कुमार चौधरी आणि गुजरातचे ग्राफीक डिझाइनर संदीप सवालिया या दोघांनी 25 - 25 लाख जिंकले आहेत. 13 व्या प्रश्नाचं उत्तर न आल्यामुळे त्यांनी क्विट करण्याचा निर्णय घेतला.