पाहा उर्मिला, फुलवानं असा केला 'अनलॉक'चा श्रीगणेशा

अतिशय सुरेख असं नृत्य सादर करत 

Updated: Jun 9, 2020, 02:14 PM IST
पाहा उर्मिला, फुलवानं असा केला 'अनलॉक'चा श्रीगणेशा title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम शिथिल करत अतिशय आशावादी हेतूनं ल़ॉकडाऊन या शब्दापासून दूर जात जनतेपुढं एक नवी संकल्पना मांडली. 'अनलॉक' किंवा 'पुन:श्च हरिओम' असं म्हणत त्यांनी नागरिकांना एका नव्या आणि तितक्याच सकारात्मक पर्वाची सुरुवात करण्याची हाक दिली. अर्थात सुरक्षितता आणि सावधगिरीचे निकष त्यांनी न चुकता अधोरेखित केले. 

मुख्यमंत्र्यांनी अनल़ॉकची हाक दिली. पाहता पाहता राज्यात टप्प्याटप्प्यानं महत्त्वाचे व्यवहार आणि पर्यायी जनजीवनही पूर्वपदावर येऊ लागलं. जणू एक नवी पहाटच. कोरोना विषाणूचं संकट पूर्णपणे टळलेलं नसूनही, किमान या संकटाला नव्याने सामोरं जाण्याच्या जिद्दीसह प्रत्येकानं या अनलॉककडं पाहिलं. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा यात मागं राहिले नाहित. 

अभिनेत्री आणि महेश कोठारे यांची सून, आदिनाथ कोठारेची पत्नी उर्मिला कोठारे आणि नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी एका अनोख्या अंदाजात या अनलॉकची सुरुवात केली. Unlock Your Passion असं म्हणत या दोघींनीही हसता हुआ नुरानी चेहरा या गाण्यावर अतिशय दिलखेचक अदाकारी असणारं नृत्य सादर केलं. 

 
 
 
 

View this post on InstagramA breeze of fresh air for all you guys as the lockdown eases... Always love dancing with this ball of energy @phulawa and to keep up with HER pace is No Joke ... We've been planning this dance collab since last month and finally here it is at a perfect time of UNLOCKDOWN 1.0 — Thank you @adinathkothare and @amar_khamkar for creatively shooting the respective videos for Us  Special thanks to Abhi (@abhineon) for Editing and Tushar Gaikwad (@dil_logical_guy) for swiftly handling the post-production ... Film : Parasmani (1963) Music : Laxmikant Pyarelal  Singers : @Lata_Mangeshkar & Kamal Barot  Performers : @UrmilaKothare & @Phulawa  Concept n choreography: @Phulawa  Camera : @amar_khamkar & @adinathkothare Edit : @abhineon  Post Production : @dil_logical_guy

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

पाहा : कौतुकास्पद! गर्भवती हरिणीला वाचवण्यासाठी जवानाची नदीत उडी

फुलवा आणि उर्मिलाची खरंतर ही जुगलबंदीच इतकी धमाकेदार ठरत आहे, की त्यांच्या या नृत्यकौशल्याचं सादरीकरण पाहताना त्यावरुन नजर हटत नाही आहे. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळतच त्यांनी आपआपल्या घरी राहूनच ही कला सादर केली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनीच दाद देत या दोन्ही अदाकारांचंही तोंड भरुन कौतुक केलं आहे. काय मग, यांनी तर केलं त्यांच्या कौशल्याला अनलॉक, तुमचा काय विचार आहे?