प्रसिद्ध गायक दलेर मेहेंदीला 2 वर्षांचा तुरूंगवास

आपल्या पंजाबी गाण्यांमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला होता. 

Updated: Jul 14, 2022, 05:54 PM IST
प्रसिद्ध गायक दलेर मेहेंदीला 2 वर्षांचा तुरूंगवास title=

Daler Mehndi Arrested: 'तुनक तुनक तूँ, दा दा दा' या गाण्यासाठी भलताच फेमस असलेला लोकप्रिय गायक दलेर मेहेंदी याला दोन वर्षांचा तुरूंगवास सुनावण्यात आला आहे. आपल्या पंजाबी गाण्यांमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला होता. त्याच्या गाण्यांवर आजही अनेक चाहते ताल धरतात. त्याची गाणी आजही लग्नात वाजवली जातात. काही वर्षांपुर्वी देलर मेहेंदी आणि त्याच्या भावाला Human Trafficking साठी गुन्हेगार ठरवण्यात आले होते. 

गायक दलेर मेहंदी याला 19 वर्षे जुन्या Human Trafficking प्रकरणासाठी दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलेरसोबत त्याच्या भावालाही तुरूंगात गुरूवारी पाठवले आहे. पटियाला हाऊस कोर्टाने गुरुवारी 19 वर्ष जुन्या Human Trafficking प्रकरणात दलेर मेहंदीला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 

19 सप्टेंबर 2003 रोजी दलेर मेहंदीचा मोठा भाऊ शमशेर मेहंदी याच्यावर कबूतर पेल्टिंग म्युझिक बँडद्वारे लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात नेल्याचा आरोप होता. त्यानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या प्रकरणात दलेर मेहंदीचेही नाव पुढे आले. हे प्रकरण 2003 चे आहे. दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमसेर सिंग यांच्यावर Human Trafficking चा आरोप आहे. दोघांविरुद्ध अमेरिकेत 31 गुन्हे दाखल आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांवर आरोप आहे की ते लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवून मोठ्या प्रमाणात पैसे घेत होते. या प्रकरणी न्यायालयाने 15 वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये दलेरला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पण दलेर मेहंदीच्या वकिलाने हा निर्णय मान्य केला नव्हता.  त्यानंतर आता न्यायालयाने दलेर आणि त्याच्या भावाला तुरुंगात पाठवलं आहे.