महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

अमिताभ बच्चन यंदाच्या वर्षी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

Updated: Sep 24, 2019, 07:58 PM IST
महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित title=

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंबंधी ट्विट करुन ही माहिती दिली. आपल्या अभिनयातून अनेकांवर छाप सोडणारे बीग बी आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. अमिताभ बच्चन यांचे सिनेमे आज ही त्यांचे चाहते उत्साहाने पाहायला जातात.

अमिताभ बच्चन यंदाच्या वर्षी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

'सात हिंदोस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरूवात झाली. परंतु 'जंजीर' या चित्रपटाने त्यांना प्रकाशझोतात आणले. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.