जनाब हिंदुस्तान में तो 'सायकल सायकल चल रहा है'

इंटरनेटवर दररोज नवनवीन काही ना काही व्हायरल होत असतं. आता इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतीलच नाही,

Updated: Jul 8, 2019, 01:57 PM IST

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : इंटरनेटवर दररोज नवनवीन काही ना काही व्हायरल होत असतं. आता इंटरनेटवर प्रादेशिक भाषेतीलच नाही, तर बोली भाषांमधील गाणी देखील व्हायरल होत आहेत. मराठीतलं 'सोनू तुला माझ्या भरवसा नाय का?', हे गाणं अचानक हीट झालं. ही गाणी त्या भाषेतील किंवा बोली भाषेतील लोकांना नवीन नाहीत, पण इंटरनेटवर या गाण्यांची खरी किंमत निश्चितच लोकांना कळतेय.

बोली भाषेतील गायक आणि संगीतकारही आता लाखोंच्या घरात पैसे मिळवू शकतायत, ते अर्थातच यूट्यूबमुळे शक्य होतंय आणि ही गाणी देखील आपल्यापर्यंत यूट्यूबमुळे पोहोचत आहेत.

मराठीची बोली भाषा आहिराणीतील गाणी देखील इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. आता खानदेश आणि मध्य प्रदेश सीमेवरील आदिवासी पावरा समाजाचं गाणं आणि नृत्य प्रकार इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यातलं 'सायकलं सायकलं मारी सोनानी सायकलं' हे गाणं नेटीझन्सने डोक्यावर घेतलं आहे.

  'सायकलं सायकलं मारी सोनानी सायकलं' हे मूळ गाणं कोणत्या गायकानं गायलंय, संगीत कुणी दिलंय, हे अजून स्पष्ट होत नसलं, तरी यातील बोल आणि नृत्य प्रकारावरून ते आदिवासी पावरा समाजाच्या बोली भाषा, 'पावरी' भाषेतील गाणं असल्याचं सांगण्यात येत आहे.

तुम्ही एकदा यूट्यूबवर सायकल सायकल सर्च करून पाहा, तुम्हाला गाणं व्हायरल होण्याची तीव्रता नक्कीच लक्षात येईल. एका जाहिरातीचं देखील विडंबन करताना, जनाब हिंदुस्तान में तो सायकल सायकल चल रहा है, असे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

निश्चित जगभरात 'सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का?' या गाण्यानंतर आदिवासी पावरा समाजाचं 'सायकलं सायकलं मारी सोनानी सायकलं' हे गाणं व्हायरल होत आहे.

या गाणं पाहिल्यावर तुम्हालाही या गाण्यावर, आदिवासी नृत्य शैलीत थिरकावं असं नक्कीच वाटेल. इंटरनेटने प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, बोलीभाषा यातील कंटेन्ट लहान मोठा असं काही ठेवलेलं नाही, ज्या त्या गाण्याचा संगीताचा, साहित्याचा कसं नेटीझन्सच्या आवडी निवडीने लागतो.