LIVE कार्यक्रमात गायक शानवर गुवाहाटीमध्ये दगडफेक

'प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये' शानचं आवाहन

Updated: Oct 30, 2018, 01:29 PM IST
LIVE कार्यक्रमात गायक शानवर गुवाहाटीमध्ये दगडफेक title=

मुंबई : बंगाली गाणं गायलं म्हणून प्रसिद्ध गायक शान याच्यावर गुवाहाटीमध्ये दगडफेक करण्यात आलीय. गुवाहाटीच्या सरुसजाई स्टेडियममध्ये २९ ऑक्टोबर रोजी एका कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. या लाईव्ह कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात शाननं एक बंगाली गाणं सुरू केल्यानंतर त्याच्यावर काही प्रेक्षकांनी दगडफेक केली.

यावर, शाननं प्रसंगावधान राखत 'एका परफॉर्मरचा मान राखा' असं आवाहन प्रेक्षकांना केलं. त्यानंतर त्यानं सोशल साईट ट्विटरवरही आपलं म्हणणं मांडलं. 

'प्रादेशिक वादाच्या विळख्यात तरुणांनी अडकू नये' असं आवाहन यावेळी शाननं केलंय. आसामचा दौरा खूपच चांगला होता... यावेळी मला अनेक नवीन मित्र भेटले, असंही शाननं म्हटलंय.