Coronavirus : कपूर कुटुंब संकटात, एकाच वेळी चौघांना कोरोनाची लागण

Coronavirus : नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनवर कोरोनामुळं गालबोट...   

Updated: Dec 29, 2021, 04:38 PM IST
Coronavirus : कपूर कुटुंब संकटात, एकाच वेळी चौघांना कोरोनाची लागण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) कहर कमी होत आहे, असं वाटत असतानाच आता पुन्हा एकदा या विषाणुचा संसर्ग अधिक घातक होताना दिसत आहे. देशात आणि जगातही बऱ्याच भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. बॉलिवूडवरही (Bollywood) याचं सावट पाहायला मिळत आहे. 

सध्या कपूर कुटुंबातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिथं या कुटुंबातील एकदोघांना नव्हे, तर चौघांना कोरोनानं गाठल्याचं कळत आहे. 

करिना कपूर खान, अमृता अरोरा या बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर आता कपूर कुटुंब कोरोनाच्या संकटानं प्रभावित झालं आहे. 

कुटुंबातील अर्जुन कपूर (Arjun Kapoor), अंशुला कपूर (Anshula), रिया कपूर (Rhea Kapoor) आणि तिचा पती करण बूलानी (Karan Boolani) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

मलायकाही संकटात... 
अभिनेता अर्जुन कपूर कोरोनाग्रस्त असल्याचं कळताच आता अभिनेत्री मलायका अरोरा हिलाही कोरोनाची चाचणी करावी लागणार असल्याचं कळत आहे. 

अर्जुन हल्लीच मलायकाच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी गेला होता. तिथंच अमृता अरोरासुद्धा हजर होती. पण, कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळं ती या पार्टीला आली होती. 

सूत्रांच्या माहितीनुसार सध्या कोरोनाग्रस्त अर्जुन, रिया कपूर, अंशुला आणि करण बूलानी घरीच विलगीकरणात आहेत., 

चौघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणं दिसली असल्याचंही म्हटलं जात आहे. अर्जुन आणि अंशुलाला (Arjun Kapoor Anshula Kapoor) कोरोना होण्याची ही दुसरी वेळ आहे.

कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेतही भावाबहिणीच्या या जोडीला कोरोनानं गाठलं होतं. आता पुन्हा या संसर्गानं त्यांना अडचणीत आणलं आहे.