मुंबई : संगीतकार- गायक अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावल्यानंतर त्यांच्यापुढील अनेक अडचणी वाढल्याचं पाहायला मिळालं. #MeToo या चळवळीअंतर्गत गायिका श्वेता पंडीत हिच्यासह इतरही काही महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले.
मलिक यांच्यावर होणारे हे आरोप पाहता त्यांच्यावर एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सध्याच्या घडीला 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदी असणाऱ्या अनू मलिक यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सोनी एंटरटेन्मेंटने याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे.
यापुढे अनू मलिक हे 'इंडियन आयडॉल'च्या ज्युरी पॅनलचे सदस्य नसतील. ठरल्याप्रमाणेच कार्यक्रमाचे पुढील भाग पार पडतील. विशाल ददलानी आणि नेहा कक्कड यांच्या साथीला भारतीय संगीत क्षेत्रातील काही दिग्गजांना पाहुणे परीक्षक म्हणून कार्यक्रमात पाचरण करण्यात येणार असल्याचं सोनी वाहिनीतर्फे सांगण्यात आलं आहे.
Anu Malik is no longer a part of Indian Idol jury panel. The show will continue its planned schedule & we'll invite some of the biggest names in Indian music as guests to join Vishal&Neha to judge extraordinary talent of Indian Idol season 10: Sony Entertainment Television #MeToo pic.twitter.com/uJmEK1cq4X
— ANI (@ANI) October 21, 2018
दरम्यान वाहिनीकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर अनू मलिक यांच्या अडचणी वाढत असल्याचच पाहायला मिळत आहेत.