आराध्या बच्चन ते अबराम खान! मुंबईच्या 'या' शाळेत शिकतात बॉलिवूड कलाकारांची मुलं

Bollywood Star kids School : शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी झालेल्या वार्षिक कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर रोहित शर्माची मुलगी देखील याच शाळेत शिकते.

सौरभ तळेकर | Updated: Dec 16, 2023, 08:28 PM IST
आराध्या बच्चन ते अबराम खान! मुंबईच्या 'या' शाळेत शिकतात बॉलिवूड कलाकारांची मुलं title=
dhirubhai ambani international school

Children Of Bollywood Actors : मुंबई म्हणजे बॉलिवूड कलाकारांची पंढरी... मुंबईत येऊन स्टार व्हायचं स्वप्न अनेकजण बघत असतात. मात्र, यश खूप कमी लोकांच्या वाट्याला येतं. पार्टीच्या निमित्ताने बॉलिवूडचे कलाकार एकत्र दिसतात. मात्र, शुक्रवारी शाळेच्या वार्षिक समारंभाला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. होय, शाळेच्या वार्षिक स्नेह संम्मेलन साजरा करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यामध्ये ऐश्वर्या राय पासून शाहरूख खानचा देखील समावेश आहे. 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बॉलिवूड कलाकारांची मुलं नेमकं कुठल्या शाळेत शिकतात? याचं उत्तर म्हणजे. मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल... धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये करीना कपूर, शाहिद कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मुले शिकतात. शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी झालेल्या वार्षिक कार्यक्रमात सर्व सेलिब्रिटींच्या मुलांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर रोहित शर्माची मुलगी देखील याच शाळेत शिकते.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकूण 60 क्लास उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त एड्रेस सिस्टम, डिजिटल क्लॉक्स, खेळाचं मैदानस बास्केट बॉल कोर्ट उपलब्ध आहे. शाळेमध्ये डिजीटल पद्धतीचे अनोखी शिक्षण पद्धती देखील आहेत. तर शाळेचे शिक्षक देखील हाय क्वालिफाईड आहेत.

शाळेची फी किती?

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी 2003 मध्ये या शाळेची स्थापना केली होती. या शाळेत आता बॉलिवूडचे अनेक स्टार अॅडमिशन घेतात. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते सातवीपर्यंतची वार्षिक फी 1 लाख 70 हजार रुपये आहे. तर इयत्ता 8 वी ते 10 वी साठी आयसीएससीची वार्षिक फी 1 लाख 85 हजार रुपये आहे. त्याचबरोबर इयत्ता 8 ते 10 साठी आयजीसीएसई (IGCSE) साठी वार्षिक शुल्क 5.9 लाख रुपये आहे. त्याचबरोबर इयत्ता 11 आणि 12 वी साठी वार्षिक फी 9.65 लाख रुपये आहे.