Mr India चित्रपटात झळकलेली 'ती चिमुरडी आता काय करते? चित्रपटसृष्टीपासून लांब करते 'हे' काम

Anil Kapoor Movie Mr. India Child Artist : अनिल कपूर यांच्या Mr. India या चित्रपटात टीनाची भूमिका साकारणारी ही बालकलाकार 37 वर्षांनी आता काय करते तुम्हाला माहितीये का...

दिक्षा पाटील | Updated: Apr 18, 2024, 05:55 PM IST
Mr India चित्रपटात झळकलेली 'ती चिमुरडी आता काय करते? चित्रपटसृष्टीपासून लांब करते 'हे' काम title=
(Photo Credit : Social Media)

Anil Kapoor Movie Mr. India Child Artist : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या 'मिस्टर इंडिया' या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं होतं. या चित्रपटात आपल्याला कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्स पाहिला. या चित्रपटात छोट्या मुलांची एक फौज आपल्याला पाहायला मिळाली. त्या मुलांनी त्या सगळ्यांच्या  अभिनयातून प्रेक्षकांची मने जिकंली होती. दरम्यान, या सगळ्या मुलांमध्ये टीना ही भूमिका साकारणारी एक मुलगी होती, जिच्या निरागसतेनं लोकांना भुरळ पडली. चित्रपटात बॉम्बस्फोटात मरणारी टीना होती. पण या अभिनेत्रीचं नाव काय होतं हे तुम्हाला माहितीये का? चला तिच्या विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

या चित्रपटात टीनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव हुजान खोदाईजी आहे. हुजान खोदाईजी आज मोठी आणि सुंदर झाली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. तर तिचे आता काही फोटो पाहिले तर तुम्ही तिला ओळखू शकणार नाही. चला तर जाणून घेऊया हुजान खोदाईजी विषयी खास गोष्ट... हुजान खोदाइजी ही इन्स्टाग्रामवर असली तरी तिनं तिचं अकाऊंट हे प्रायव्हेट ठेवलं आहे. तरी तिच्या चाहत्यांना तिचे फोटो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळतात. 

child artist who played tina s role in mr india now doing this job after 37 years

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये हुजान खोदाइजी खूप सुंदर दिसते. तिच्या गालावर येणारी खळी आजही तितकीच सुंदर आहे. मिस्टर इंडियानंतर हुजाननं कोणत्याही दुसऱ्या चित्रपटात काम केलं नाही. 37 वर्षांपूर्वी जेव्हा हुजान या चित्रपटात दिसली होती. तेव्हा तिच्या निरागसतेनं सगळ्यांचे लक्ष वेधून गेले होते. जेव्हा हुजाननं या चित्रपटात काम केले होते, तेव्हा ती फक्त 6 वर्षांची होती.

हेही वाचा : वय म्हणजे फक्त आकडा! 66 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं केलं दुसरं लग्न, तिचा पती आहे तरी कोण?

आज हिच हुजान 43 वर्षांची आहे. हुजानला दोन मुली आहे. तर तिला लाइमलाइटपासून लांब रहायाला आवडते. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री शोनाली नागरानीनं टीना उर्फ हुजानसोबत एक फोटो शेअर केला होता, त्यात ती खूप सुंदर दिसत होती.  दरम्यान, असे म्हटले जाते की हुजान ही सध्या मार्केटिंग फील्डमध्ये काम करते. तर एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुजान ही लिंटास नावाच्या एका अॅडव्हर्टायझिंग एक्झीक्यूटिव्ह कंपनीत काम करते. तिच्यासोबत या चित्रपटात दिसणारे अनेक बालकलाकार हे आजही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.