Viral Video : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळलं; म्हणते, 'देवबाप्पा रागावलास का...'

Ganesh Visarjan Video : तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या परीला (Myra vaikul) गणपती विसर्जनावेळी रडू कोसळलं. बाप्पाचा निरोप घेताना नेमकं काय म्हणते मायरा? पाहा...

Updated: Sep 23, 2023, 10:14 PM IST
Viral Video : लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळलं; म्हणते, 'देवबाप्पा रागावलास का...' title=
Myra Vaikul Ganesh Visarjan Video

Myra vaikul Viral Video : माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेतील अभिनेत्री आणि बालकलाकार मायरा वैकूळ (Myra vaikul) अल्पावधीच लोकप्रिय झाली आहे. आज तिचा गोंडसपणा आणि लाघावीपणा घराघरातील प्रेक्षकांना आवडतो. तिची भूमिकाही अनेकांना आपलीशी वाटली होती. सोशल मीडियावर देखील मायराचे अनेक फॅन्स आहेत. तिच्या एका व्हिडीओची अनेकजण वाट पाहत असतात. सोशल मीडियावर तिचे नवनवीन क्युट व्हिडीओ ती शेअर करत असते. अशातच आता इन्टाग्रामवर मायराचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळतोय. पाच दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन (Ganesh Visarjan) झालं. काळजावर दगड ठेऊन अनेकांनी गणपतीला पुढल्या वर्षी लवकर या, अशा मनोभावी आरोळ्या दिल्या. अशातच सर्वांची लाडकी परी म्हणजे बालकलाकार मायरा वैकुळच्या घरीही बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मायराने देखील आज बाप्पांना निरोप दिला. मात्र, निरोप देताना मायराला रडू कोसळलं. त्याचा व्हिडीओ (Myra vaikul video) सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे.

आणखी वाचा - मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

गणपती बाप्पा, का रे मला सोडून गेलास? रागावलास का माझ्यावर? खरं सांगू आता तुझी खूप आठवण येईल. पुढच्या वर्षी मी तुला खूप मोदक आणि लाडू खाऊ घालेन, पण तू लवकर ये, मी तुझी वाट बघतेय, असं मायरा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला म्हणताना दिसत आहे. गणपती बसल्यापासून मायरा तिचे व्हिडीओ इन्टाग्रामवर (Instragram Video) शेअर करत होती. आता गणपतींचा निरोप देताना तिचं मन भरून आलं.

पाहा Video

दरम्यान, सण किंवा उत्सव कोणताही असो, मायरा नेहमी तिच्या कलागुणांना वाव देताना दिसते. तिचे अनेक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा असा तिचा मराठमोळा पारंपरिक लूक अनेकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतो.