VIDEO: हनी सिंगचा आणखी एक धमाका, ‘छोटे छोटे पेग लगा ले’!

प्रसिद्ध गायक हंसराज हंस यांच्या गाण्याच्या चालीने हनी सिंग कमबॅक करत आहे.

Updated: Jan 19, 2018, 09:00 AM IST
VIDEO: हनी सिंगचा आणखी एक धमाका, ‘छोटे छोटे पेग लगा ले’! title=

नवी दिल्‍ली : यो यो हनी सिंह आपल्या जोरदार कमबॅकसाठी सज्ज आहे. प्रसिद्ध गायक हंसराज हंस यांच्या गाण्याच्या चालीने हनी सिंग कमबॅक करत आहे. हंसराज हंस यांच्या ‘टोटे टोटे’ या गाण्याचे शब्द बदलून त्याच चालीवर नवं गाणं केलं आहे. 

‘सोण्य के टीटू की स्वीटी’ या सिनेमाचं नवं गाणं रिलीज झालं आहे. ती मुख्य कलाकार यात डान्स करताना दिसत आहे. यातील अभिनेत्रीने जास्तच आकर्षक डान्स केल्याने हे गाणं जास्त गाजत आहे. हे गाणं हनी सिंग, नेहा कक्कर आणि नवराज संह यांनी गायलंय तर या गाण्याचे बोल हनी सिंगने लिहिले आहेत. 

या गाण्यात कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा आणि सनी सिंग दिसत आहेत. याच सिनेमातील ‘दिल चोरी साडा’ हे गाणं हनी सिंगचं कमबॅक सॉंग बनलं होतं. हे गाणं सोशल मीडियात पहिल्य क्रमांकवर ट्रेंड करत आहे.