'मोदी-शहा हिंदू नाहीत'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना मी हिंदू मानत नाही

Updated: Jan 18, 2018, 08:59 PM IST
'मोदी-शहा हिंदू नाहीत' title=

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना मी हिंदू मानत नाही, अशी टीका अभिनेता प्रकाश राज यानं केली आहे. मी हिंदू विरोधी असल्याचा प्रचार ते करतात पण मी मोदी विरोधी, शहा विरोधी आणि हेगडे विरोधी असल्याचं प्रकाश राज म्हणालाय. इंडिया टूडे कॉनक्लेव्ह २०१८ या कार्यक्रमात प्रकाश राजनं हे वक्तव्य केलं आहे.

मोदी सरकारचा मंत्री एखाद्या धर्माला संपवण्याचा गोष्टी करतो. पण याबद्दल मोदी किंवा अमित शहा काहीच बोलत नाहीत. भाजपचा मंत्री एखाद्या विचारधारेला संपवण्याचं मत व्यक्त करतात, असे लोक हिंदू असूच शकत नाहीत. हिंसा आणि हत्येचं समर्थन करणाऱ्यांना मी हिंदू मानत नाही, असं प्रकाश राज म्हणाला.

गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या हत्येचा काही जणांनी उत्सव केला. अशा लोकांना मोदी ट्विटरवर फॉलो करतात. मी मोदींना मत दिलं असेल किंवा नसेल. ते माझे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी अशा लोकांविषयी बोललं पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रकाश राज यांनी दिली आहे. 

पाहा काय म्हणाला प्रकाश राज