मुंबई : आवाजाचे जादूगार, व्हाईस अॅक्टर चेतन सशितल यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल, पण त्यांनी वेगवेगळ्या कलाकारांना देखील आवाज दिलेले आहेत. चेतन सशितल हे असं व्यक्तिमत्व आहे, की त्यांना कुणाचा आवाज काढता आला नाही, असं शक्यच झालेलं नाही.
अगदी बॉलीवूडचा अभिनेता अमिताभ बच्चन ते खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले अमरिश पुरी यांचा देखील ते आवाज काढतात. कार्टुन नेटवर्कमधील तुमच्या ओळखीच्या अनेक पात्रांना त्यांनी आवाज दिला आहे, यावर देखील तुमचा विश्वास बसणार नाही.
बॉलीवूडचं नाही क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनाही जाहिरातीच्या निमित्ताने चेतन सशितल यांनी आवाज दिला आहे, यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते कपिल देव यांच्या आवाजाचा देखील समावेश आहे. राजकारण्यांमध्ये थेट बाळासाहेबांनाचा बाळासाहेबांचा आवाज काढून दाखवणारे चेतन सशितल आहेत.
बाळासाहेबांनीही आपला सेम टू सेम आवाज ऐकून , प्रेमपूर्वक धमकावताना म्टटलं होतं, आता या पुढे नको काढूस. १९६८ साली जन्माला आलेल्या चेतन सशितल यांनी अनेक दिग्गज कलाकारांचे आवाज डबिंगसाठी दिले. चेतन सशितल हे उत्तम गायक देखील आहेत.