Amruta Khanvilkar : चंद्रमुखीची प्रसाद ओकसाठी खास पोस्ट, म्हणाली - 'तू जे जे केलंस त्यासाठी...'

सिने अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी'ने बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चंद्रमुखीमुळे अभिनेत्री अमृता खानविलकर खूपच चर्चेमध्ये आहे.

Updated: May 7, 2022, 11:26 AM IST
Amruta Khanvilkar : चंद्रमुखीची प्रसाद ओकसाठी खास पोस्ट, म्हणाली - 'तू जे जे केलंस त्यासाठी...' title=

मुंबई : सिने अभिनेता प्रसाद ओक ( Prasad Oak ) दिग्दर्शित 'चंद्रमुखी'ने ( Chandramukhi ) बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चंद्रमुखीमुळे अभिनेत्री अमृता खानविलकर ( Aamruta Khanvilkar ) खूपच चर्चेमध्ये आहे.

लेखक विश्वास पाटील ( Vishwas Patil ) यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर हा सिनेमा आहे. 'चंद्रमुखी'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली. तर गेल्या  पाच दिवसात जवळपास ६.२१ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व शो सध्या हाऊसफुल आहेत.

‘चंद्रमुखी’ला मिळत असलेले हे यश पाहून अमृता खानविलकर सध्या खूपच आनंदात आहे. याच आनंदात तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

अमृता खानविलकरने इन्स्टाग्रामवर 'चंद्रमुखी' चित्रपटातील शूटींगदरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'सवाल जवाब' ( Sawal Jawab ) लावणीदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यात अमृताला कशाप्रकारे नृत्य आणि हावभाव करायचे याबाबत दिग्दर्शक प्रसाद ओक मार्गदर्शन करताना दिसत आहे. तर, दुसऱ्या व्हिडीओत अमृता हुबेहुब तसेच नृत्य करताना दिसतेय.

प्रसाद याने केलेल्या मार्गदर्शनामुळे अमृता खानविलकरने साकारलेली 'चंद्रमुखी'ची भूमिका, अभिनय आणि तिची लावणी प्रेक्षकांना खूप आवडली आहे, असे तीला वाटतंय. याबद्दल तिने पोस्टमध्ये लिहिलंय, 'चंद्रा सांगते एका…, किती वर्णू ग महिमा त्याचा ….. ह्या एका वाक्यात सगळं आलं ….' 

'प्रसाद ओक… कादंबरी देण्यापासून ते शेवटचं गाणं करण्यापर्यंत … तू जे जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत ….. मला स्वतःशी ओळख करून देण्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन…’, असे अमृताने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.