Chala Hawa Yeu Dya | माझ्या खिशात पैसे नव्हते, पण मी कधी ही उपाशी झोपलो नाही....भारत गणेशपुरेच्या स्ट्रगलची कहाणी

भारत गणेश पुरेने त्यावर खुलासा केला की, "माझ्या सोबत असं काही झालं नाही. कारण माझं कोणासोबतही वैर नव्हते आणि मी पूर्ण ओडीशन वैगरे देणे अशा सगळ्या प्रोसेसमधून मी आलो आहे. 

Updated: Mar 27, 2021, 07:31 PM IST
Chala Hawa Yeu Dya |  माझ्या खिशात पैसे नव्हते, पण मी कधी ही उपाशी झोपलो नाही....भारत गणेशपुरेच्या स्ट्रगलची कहाणी title=

मुंबई : स्ट्रगलिंगच्या काळात तुला कोणी नाकारलं का? आणि आता यशाच्या काळात ती व्यक्ती समोर आली असं कधी झालय का? असा सवाल केला तेव्हा, भारत गणेश पुरेने त्यावर खुलासा केला की, "माझ्या सोबत असं काही झालं नाही. कारण माझं कोणासोबतही वैर नव्हते आणि मी पूर्ण ओडीशन वैगरे देणे अशा सगळ्या प्रोसेसमधून मी आलो आहे. त्यामुळे मला नाकरले असे नाही. फक्त मी एखाद्या रोलसाठी सुट होत नाही म्हणून मग मला नाकारलं गेलं आहे. पण राजकारणामुळे वैगरे नाकारलं असं काही नाही." (संपूर्ण व्हीडिओ पाहा बातमीच्या शेवटी)

मित्रांचे कपडेही वापरले

पुढे एक किस्सा सांगताना भारत म्हणाला की, "आमदार भवनात राहाताना माझा एक मित्र होता प्रशांत म्हणून, त्याचे चांगले इस्त्री केलेले कपडे असायचे आणि त्यावेळेला शुटसाठी स्वत:चेच कपडे असायचे. ते मी गपचुप घेऊन जायचो शुटसाठी. आणि मग तो आल्यावर मला विचारायचा की माझे कपडे घेऊन गेला होतासना?

मी नाही म्हणायचो पण मग तो म्हणायचो ठिक आहे आता तुझा ऍपीसोड येईलचं तेव्हा समजेलच मला, असे आम्ही भांडायचो. पैसे नव्हते माझ्या खिशात त्या वेळेला पण मी कधी ही उपाशी झोपलो नाही. कारण माझे मित्र मला खूप मदत करायचे."

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.