मुंबई : नमस्कार मंडळी... कसे आहात मजेत ना आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे हसताय् ना हसायला च पाहिजे असं म्हटलं की, प्रत्येकाच्या ओठातून चला हवा येवू द्या शोचं नाव येतच. रात्री 9.30 वाजले की, प्रत्येक घरात झी मराठी चॅनलवर चला हवा येवू द्या हा कार्यक्रम लागतोच. चाहत्यांचे शोमधील सगळेच लाडके कलाकार प्रेक्षकांच मनोरंजन भरभरुन करतात. दर सोमवारी मंगळवारी टेलिकास्ट होणारा शो हवा येवू द्या गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.
सध्या चर्चा फक्त आऊचीच
नुकताच टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये सगळ्याच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णींनी शोमध्ये हजेरी लावली होती. याचबरोबर या शोमध्ये त्यांच्यासोबत सुचित्रा बांदेकरदेखील सहभागी झाल्या होत्या. या एपिसोडची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या एपिसोडमध्ये आऊंचाच दबदबा पहायला मिळाला. भाऊ कदमची बायको वॉचमनसोबत पळून गेली असं तो म्हणतो. आणि तो रडू लागतो अशाप्रकारे स्किटला सुरुवात होते. या स्किटमध्ये पुढे एका सासू सुनेची भन्नाट केमेस्ट्री दाखवण्यात आली आहे.
सासू मुद्दाम नाटक करते आणि सुन तिच्यावर भडकते अशी ही स्किट आहे. ही स्किट सुरु होते आणि सून भांडत सासू सोबत एंट्री घेते. यादरम्यान सोफ्यावर बसलेली एक व्यक्ती त्या सुनेवर भडकते आणि म्हणते किती भांडताय तुम्ही म्हाताऱ्या बाईसोबत, यावर ती सून म्हणते तुम्हाला माहित नाही ही म्हातारी कशी नाटक करते हे. आणि सून त्या अनोळखी व्यक्ती सोबतही भांडू लागते.
इतक्यात आऊ या स्किट दरम्यानच चिडतात आणि त्या सुनेला शटअप म्हणत सूनेसोबत भांडू लागतात. यानंतर ती सून म्हणते तुम्हाला पण माहित नाही ही सासू कशी आहे किती नाटक करते. मी तुमच्या मुली सारखी आहे. यांवर आऊ तिला बोलतात गप्प बसं, यावेळी स्टेजवर असणारे सगळेच हसून हसून लोटपोट होतात त्या जरी भडकलेल्या दिसल्या असल्या तरी हा एक स्क्रिप्टचाच भाग आहे. हा ड्रामा संपूर्ण स्किट चालूच रहातो. आऊंनी शोमध्ये येवून चारचांद लावत शोची शोभा वाढवली हे मात्र नक्की. आऊ या मनोरंजन सृष्टीत सगळ्याच कलाकारांच्या लाडक्या आहेत. सगळे कलाकार त्यांचा खूप आदर करतात.