'लव आज कल' चित्रपटातील किसिंग सीनवर कात्री

उद्या म्हणजे व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर 'लव आज कल' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.  

Updated: Feb 13, 2020, 11:01 AM IST
'लव आज कल' चित्रपटातील किसिंग सीनवर कात्री  title=

मुंबई : इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल' सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाने लव्ह मेकिंग सीनवर कात्री लावण्यत आली.बोर्डाच्या आदेशानंतर कार्तिक- सारामधील किसिंग सीन सिनेमातून हटवण्यात आलेत. याशिवाय बोर्डाने निर्मात्यांना इंटिमेट सीन ब्लर करण्यास सांगितले आहेत. या सर्व अटींनंतर सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट देण्यात आलंय..

उद्या म्हणजे व्हेलेंटाईन डेच्या मुहूर्तावर 'लव आज कल' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सारा आणि कार्तिक प्रथमचं एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. शिवाय चित्रपटाच्या शूटींग दरम्यान त्यांच्या नात्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. 

दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेत्री सारा खानने तिच्या मनात असलेली गोष्ट सर्वांशी शेअर केली होती. तिला कार्तिक बरोबर डेटवर जायचं आहे, अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. त्यानंतर इम्तियाज अलीच्या 'लव आजकल'' या आगामी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिक आणि साराला एकत्र काम करण्याची संधी मिळली.

२००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा 'लव आजकल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपट हीट झाला होता. आता सारा आणि कार्तिकची जोडी पद्यावर काय धमाल करणार ? हे चित्रपट आल्यावर कळेलच.