‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबिताची अटक अटळ, अजामिनपात्र गु्हा

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणं पडलं भारी 

Updated: May 19, 2021, 01:31 PM IST
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील बबिताची अटक अटळ, अजामिनपात्र गु्हा title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka ooltah Chashmah)मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta)ला व्हिडिओ बनवताना जातिवाचक शब्द वापरणं अतिशय महागात पडलं आहे. मुनमुन विरोधात मंगळवारी संध्याकाळी एससी/ एसटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एवढंच नव्हे तर मुनमुन विरोधात दलित समाजाच्या लोकांनी निदर्शने देखील केली आहे.  

मुनमुनने व्हिडिओत काय म्हटलं होतं? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मुनमुन दत्ताने सोशल मीडियावर एक मेकअप ट्युटोरिअल व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने 'माझ्याकडे लिप टिंट आहे. ज्याला मी चेहऱ्यावर ब्लश प्रमाणे लावली आहे. कारण मी लवकरच यूट्यूबवर डेब्यू करत आहे. आणि मला चांगल दिसायचं आहे'. या दरम्यानच मुनमुनने जातिवाचक शब्दाचा वापर केला. हा व्हिडिओ अगदी वाऱ्यासारखा व्हायरल झाला. आणि त्यानंतर तिला याशब्दानंतर ट्रोल करण्यात आलं. 

पोस्ट शेअर करून मागितली होती माफी 

बबीताने ट्रोल झाल्यानंतर लगेचच माफी मागितली होती. मुनमुनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. ही पोस्ट त्या व्हिडिओ संदर्भात आहे. जो मी काल पोस्ट केला होता. ज्या व्हिडिओत माझ्याकडून चुकीच्या शब्दांचा वापर झाला. मला कुणालाही दुखवायचं नव्हतं किंवा कुणाचा अपमानही करायचा नव्हता. 

मला त्या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. मला त्या शब्दाचा अर्थ कळताच मी लगेचच तो व्हिडिओ काढून टाकला. मी प्रत्येक जात आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर करते. मी त्या सगळ्यांची माफी मागते ज्यांचं मी नकळत मन दुखावलं आहे.