कान्समध्ये Deepika Padukone ला पाहून 'तो' झाला Out of Control; Video आला समोर

बॉलिवू़डची मस्तानी दीपिका पादुकोन हिच्यासोबत कान्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आहेत.  

Updated: May 23, 2022, 07:07 PM IST
कान्समध्ये Deepika Padukone ला पाहून 'तो' झाला Out of Control; Video आला समोर  title=

मुंबई : बॉलिवूडमधल्या असंख्य अभिनेते, अभिनेत्रींनी कान्स फेस्टीव्हसमध्ये हजेरी लावलीय. या फेस्टीव्हलमधल्या  अनेक सेलिब्रेटींचे फोटो आपण पाहिले असतीलचं. या फोटोंत भारतीय स्टार्स खुलून दिसत आहेत. त्यात बॉलिवू़डची मस्तानी दीपिका पादुकोन हिच्यासोबत कान्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आहेत.  

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दीपिका पादुकोनचा ज्युरी सदस्यांमध्ये समावेश करण्यात आलाय. त्यामुळे दरदिवशी कान्समध्ये दीपिकाचे अनेक आकर्षक लूक आपल्याला फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. त्यातच आता दीपिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दीपिका पादुकोन रेड कार्पेटवर उतरून फोटोसाठी पोझ देताना दिसतेय. फोटोसाठी पोझ देत असतानाचं एक व्यक्ती तिला एक टक पाहत असतो. दीपिकाला काही समजण्याआधीच या व्यक्तीने दीपिकाला मिठी मारली आणि त्याने तिला किस केले.

दीपिका सुरुवातीला थोडी शॉकमध्ये होती. नंतर ती त्या व्यक्तीचा हात तिच्या कंबरेवरून काढताना दिसली, पण दीपिकाने तो हॉलिवूड अभिनेता असल्याचे ओळखताच तिने त्याला मिठी मारली. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.