Cannes festival : टॉपलेस होत महिला पोहचली रेड कार्पेटवर

कान्स फेस्टिव्हल 2022 जोरात सुरू आहे. 

Updated: May 25, 2022, 07:13 PM IST
Cannes festival : टॉपलेस होत महिला पोहचली रेड कार्पेटवर title=

मुंबई : कान्स फेस्टिव्हल 2022 जोरात सुरू आहे. कान्स फेस्टिव्हलमधील अनेक सेलिब्रिटींचे लूक समोर येत आहेत.   दरम्यान, असंच काहीसं घडलं, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला रेड कार्पेटवर टॉपलेस होऊन आली आणि जोरजोरात ओरडू लागली. या संपूर्ण दृश्याचा एक व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे हे प्रकरण 
खरंतर हॉलीवूड स्टार टिल्डा स्विंटन आणि इद्रिस एल्बा त्यांच्या नवीन चित्रपट थ्री थाउजंड इयर्स ऑफ लाँगिंगच्या प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर होते. दरम्यान, एक महिला रेड कार्पेटवर धावत येते आणि ओरडू लागते. या महिलेने तिच्यावर युक्रेनच्या ध्वजाचे रंग चढवले होते आणि यावर तिने लिहीलेला संदेश चर्चेचा विषय ठरत आहे. 'आमच्यावर बलात्कार करणं थांबवा' असं या महिलेने लिहिलं होतं. महिलेने रक्ताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल रंगाची पँटी देखील घातली होती. ती महिला कार्पेटवर येते आणि काही सेकंद जोरजोरत नारे देते.  त्यानंतर रक्षक येतात आणि तिला काळ्या कपडयाने झाकतात.

का केलं महिलाने असं?
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही महिला युक्रेनमधील कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे.  युक्रेन आणि रशियामध्ये अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या सगळ्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष विलादिमीर झेलेन्स्की यांनीही आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांत महिलांवर बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत. ते म्हणाले की, रशियन सैन्य महिला आणि मुलांचं लैंगिक शोषण करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. लोकं युक्रेनच्या पाठीशी उभे असल्याबद्दल बोलत आहेत. मात्र,  यंदाच्या कान्स महोत्सवात युद्ध ही थीम आहे. युक्रेनच्या मुद्द्यावर महिलांनी टॉपलेस होऊन निषेध व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावर्षी मार्चमध्ये काही महिला कार्यकर्त्यांनी टॉपलेस होऊन पुतीन यांच्याविरोधात निषेध नोंदवला होता.